Jyotish Tips : आजही अनेकजण ज्योतिषशास्त्रानुसार अनेक कामे करत असतात. तसेच ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावरून आणि शरीरावरुन त्याचा स्वभाव जाणून घेता येऊ शकतो. तसेच मुलींबद्दल ज्योतिषशास्त्रात महत्वाच्या टिप्स सांगण्यात आल्या आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीराच्या विविध भागांची रचना, तिळ आणि त्यावरील इतर खुणा दिसतात. त्यांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचे भविष्य अचूकपणे सांगता येऊ शकते.
सामुद्रिक शास्त्राच्या मदतीने कोणत्या मुलीचे लग्न कधी केले पाहिजे हे अचूकपणे जाणून घेता येईल. याद्वारे तुम्ही अशी मुलगी शोधू शकता जिच्याबरोबर लग्न करताच तुमचे नशीब चमकेल.
भाग्यवान मुलींची ओळख चिन्हे
रुंद कपाळ
ज्या मुलींचे कपाळ रुंद आहे अशा मुलींशी लग्न करणे भाग्यकारक मानले जाते. जी मुलगी अर्धचंद्राच्या आकाराचे असते तिच्यावर देवाचा आशीर्वाद असतो असे मानले जाते. अश्या मुलीशी लग्न झाल्यानंतर माता लक्ष्मी घरात वास करते.
कपाळावर त्रिशूल चिन्ह
मुलीच्या कपाळावर कुठेही त्रिशूलाचे चिन्ह दिसत असेल तर देवाचा आशीर्वाद तिच्यावर असतो. अशा मुली केवळ स्वत:लाच नाही तर आपल्या साथीदारांनाही संपत्तीने समृद्ध बनवतात. अशा मुलींचा सर्वत्र आदर केला जातो.
पायाचा अंगठा
ज्या मुलींच्या पायाची बोटं सुंदर, गोलाकार, गुलाबी किंवा लाल रंगाची आणि वाढलेली असतात त्या खूप भाग्यवान असतात. ती ज्याच्याशी लग्न करते, त्या व्यक्तीचे आणि तिच्या सासरचे नशीबही चमकते.