काँग्रेसला दे धक्का ! नवज्योतसिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग्रेसमधील वाद मिटण्याऐवजी ते अधिकच उफाळून आले आहेत.

आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाब काँग्रेसमधील राजकीय गोंधळ संपताना दिसत नाही.

आता पंजाब काँग्रेसमधील अजून एका बड्या नेत्याने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. पंजाब काँग्रेसचे कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पंजाबचे भविष्य आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्याशी मी तडजोड करू शकत नाही असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू यांनी आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होणार असल्याने

त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. मात्र नवज्योतसिंग सिद्धू यांचा पुढचा काय प्लॅन असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe