ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मस्तपैकी गोवा फिरायला जा! पण समुद्रकिनारेच न पाहता ‘ही’ ठिकाणी देखील बघा; मनाला मिळेल निवांतपणा

गोव्याला गेले म्हणजे आपण त्या ठिकाणचे सुंदर आणि विस्तीर्ण असे समुद्रकिनारे पाहतो. परंतु या समुद्रकिनाऱ्याव्यतिरिक्त गोव्यामध्ये असे अनेक पर्यटन स्थळे आहेत की ते पर्यटकांना नक्कीच भुरळ घालतात व त्यांचे महत्त्व देखील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे आहे.

Published on -

बरेच जण मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जायचा प्लान बनवतात व अशाप्रकारे फिरायला जाणे हे दररोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा मोकळा वेळ काढून मनाला शांतता मिळावी व मनसोक्त असा कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवता यावा हा त्यामागचा प्रमुख उद्देश असतो.

अशाप्रकारे एखाद्या लोकप्रिय पर्यटन स्थळे किंवा लोकप्रिय निसर्गाने समृद्ध असलेल्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर ती एक प्रकारे रिचार्ज होतो व पुन्हा आपल्या कामांना उत्साहाने सुरुवात करू शकतो.

भारताचा विचार केला तर भारतामध्ये अशी अनेक प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे आहेत व काही राज्य तर त्यांच्या विविध अशा वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात व असेच एक राज्य म्हणजे गोवा हे होय.

गोव्याला गेले म्हणजे आपण त्या ठिकाणचे सुंदर आणि विस्तीर्ण असे समुद्रकिनारे पाहतो. परंतु या समुद्रकिनाऱ्याव्यतिरिक्त गोव्यामध्ये असे अनेक पर्यटन स्थळे आहेत की ते पर्यटकांना नक्कीच भुरळ घालतात व त्यांचे महत्त्व देखील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे आहे.

 गोव्यामध्ये समुद्रकिनाऱ्यांशिवाय ही पर्यटन स्थळे पहा आणि निवांतपणा अनुभवा

1- अंजुना बीच गोव्यामध्ये ज्या काही प्रसिद्ध बीच आहेत त्यापैकी अंजूना बीच एक ऐतिहासिक बीच म्हणून ओळखले जाते. या बीचची एक प्रमुख ओळख म्हणजे या ठिकाणाचे नाईटलाईफ आणि बाजारपेठ हे होय.

तुम्ही गोव्याला भेट दिल्यानंतर जर अंजुना बीचला भेट दिली नाही तर गोव्याची ट्रीप तुमची अपूर्ण राहते. या ठिकाणाचा चकचकीत असा समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही काही वेळ निवांत घालवला तर मनाला निरव अशी शांतता लाभते.

2- अगौडा किल्ला गोव्यातील हा सर्वात जुना किल्ला म्हणून प्रसिद्ध असून हा समुद्रकिनारी वसलेला आहे. या किल्ल्यावरून तुम्हाला गोव्याच्या समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

तुम्हाला जर या किल्ल्यावर असलेला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान म्हणजेच हिवाळ्याच्या कालावधीत भेट देणे गरजेचे आहे व या कालावधीत या ठिकाणाचे तापमान 20° c ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहते.

3- कळंगुट बीच गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी कळंगुट बीच हे एक खूप महत्त्वाचे बीच असून या बीचला किनाऱ्यांची राणी असे देखील म्हणतात. या बीच वरील सौंदर्य आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जलक्रीडा सुप्रसिद्ध आहेत.

तसेच कळंगुट बीच समुद्रकिनाऱ्यावरील श्याक आणि दोलायमान नाईटलाइफसाठी ओळखले जाते. त्यामुळे कळंगुट बीचला दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात.

4- चापोरा किल्ला हा एक गोव्यातील ऐतिहासिक असा किल्ला असून या ठिकाणाहून तुम्हाला आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. या किल्ल्याच्या आतमध्ये सेंट अँथनीला समर्पित केलेले चर्च गायब झाले आहे व त्याच्या फक्त आता काही खुणाच त्या ठिकाणी शिल्लक आहेत.

5- गोव्यातील चर्च गोव्यातील चर्च या खूप प्रसिद्ध असून या ठिकाणी बॉम जीझस बॅसिलिका, त्याच्या वास्तुकला आणि धार्मिक महत्त्वासाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. आपल्याला माहित आहे की गोवा हे पोर्तुगीज भारत आणि आशियाची राजधानी होती व गोवा हे सोळाव्या शतकापासून धर्मप्रसाराचे केंद्र देखील बनलेले होते.

त्यामुळे धार्मिक वास्तूंचा ही जागतिक वारसा गोव्यातील या पर्यटन सारख्या यादीत आहे. गोव्यातील या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि त्या ठिकाणाच्या सांस्कृतिक वारशाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात.

6- दूधसागर धबधबा गोव्यातील दूध सागर धबधबा अप्रतिम असून या ठिकाणी तुम्ही जीप सफारी तसेच ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतात. हा धबधबा अगदी दुधासारखा दिसतो म्हणून याला दूधसागर धबधबा असे म्हटले जाते. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य मनाला भुरळ घालते. पणजी शहरापासून साधारणपणे 55 ते साठ किलोमीटर अंतरावर दूध सागर धबधबा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!