सोन्याचे भाव वधारले; जाणून घ्या आजचे दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- राजधानी दिल्लीत गुरूवारी सोन्याचा भाव 194 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे. यामुळे सोन्याचा भाव 49,455 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 48,261 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला आहे.

दुसरीकडे, चांदीबाबतबोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरूवारी चांदीच्या दरात वाढ दिसली आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव सकाळी 849 रुपयांच्या म्हणजे 1.29 टक्के वाढीसह 66,760 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती.

महाराष्ट्रात सोने महाग, चांदीत किरकोळ वाढ सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 400 रुपयांनी वाढ झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 49,710 रुपयांवर सुरू आहे.

तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 48,710 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 49,310 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 48,310 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून महाराष्ट्रात चांदीच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाली आहे. काल 64,150 वर असलेली चांदी आजही 65,600 रुपयांवर विकली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment