अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- मागील सत्रात एमसीएक्सवरील डिसेम्बर डिलीव्हरी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50600 रुपयांवर बंद झाले. शुक्रवारी ते 65 रुपयांनी वाढून ते 50,665 रुपयांवर उघडले.
सुरुवातीच्या व्यापारात त्यांनी 50609 रुपये न्यूनतम स्तर आणि 50665 रुपयांच्या उच्चांकाला गेला. सकाळी दहा वाजता 46 रुपयांच्या तेजीसह 50646 रुपयांवर व्यापार झाला. फेब्रुवारी डिलिव्हरी सोन्याचे भावही 74 रुपयांनी वाढून 50,747 रुपयांवर पोहोचले.
सराफा किंमतीत किंचित घसरण :- गुरुवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 81 रुपयांनी घसरून 50,057 रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली. यापूर्वी बुधवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 50,138 रुपयांवर बंद झाले होते. त्याचप्रमाणे चांदीही किरकोळ घटून 62,037 रुपये प्रतिकिलो राहली. यापूर्वी बुधवारी चांदी 62,041 रुपये प्रतिकिलो होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,865 डॉलर होता.
वायदा भाव तेजीत :- सणासुदीच्या हंगामातील मागणी वाढल्याने गुरुवारी सोन्याचे वायदा मूल्य 104 रुपयांनी वाढून 50,273 रुपयांवर गेले. एमसीएक्सवर डिसेंबरमध्ये झालेल्या डिलिव्हरी सौद्यांमध्ये सोन्याचे वायदाचे दर 104 रुपये किंवा 0.21 टक्क्यांनी वाढून 50,273 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. या वायदा कराराअंतर्गत 9,890 लॉटची विक्री झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमधील सोन्याचे दर 0.08 टक्क्यांनी वधारून ते 1,863.10 डॉलर प्रति औंस झाले.
दागिन्यांची मागणी 48 टक्क्यांनी कमी झाली :- अहवालात म्हटले आहे की, दागिन्यांची मागणी वार्षिक आधारावर तिसऱ्या तिमाहीत 48 टक्क्यांनी घटून 52.8 टन झाली आहे. अहवालात म्हटले आहे की कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे आणि सोने खरेदीसाठी योग्य वेळ मिळाला नाही म्हणून दागिन्यांची मागणी घटली आहे. तथापि, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत दागिने मागणीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर दागिन्यांची मागणी घटली असताना, तिमाहीत सोन्याच्या बार आणि नाण्यांच्या मागणीत चांगली वाढ दिसून आली आहे.
यंदा सोन्याची विक्री मागील 12 वर्षातील नीचांकी पातळीवर राहण्याची शक्यता :- देशात सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते, परंतु या सणाच्या हंगामात म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत सोन्याची विक्री मागील 12 वर्षातील नीचांकी पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
कोविड – 19 ने सर्व देशभर विशेषत: शहरांमध्ये सोन्याची खरेदी करण्याच्या लोकांच्या क्षमतेवर तीव्र परिणाम झाला आहे. साधारणत: सणासुदीच्या काळात देशात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु यावेळी कोरोना संक्रमण आणि कमकुवत आर्थिक वाढीमुळे सोन्याची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत कमी होईल.
मागील वर्षी सणाच्या हंगामात 194 टन सोन्याची विक्री झाली होती. लंडनच्या मेटल्स फोकसच्या सल्लागार चिराग सेठ यांच्या म्हणण्यानुसार, भारतात सणासुदीच्या हंगामातील सोन्याची विक्री 2008 नंतरची सर्वात कमी विक्री होईल असे अपेक्षित आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved