सूनेने चाकूने भोसकून केली सासूची हत्या, त्यानंतर तिचे डोळेही फोडले आणि…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- बिहारमधील पाटणा येथे धक्कादायक घटना घडली आहे. रागाच्या भरात सूनेने आपल्या सासूची चाकूने भोसकून हत्या केली.

त्यानंतर तिचे डोळेही फोडले. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, परसा बाजार परिसरातील सकरैचा गावात वृद्ध सासूची सूनेने रागाच्या भरात निर्घृण हत्या केली.

धर्मशीला देवी असे मृत सासूचे नाव आहे. तर आरती देवी असे सूनेचे नाव आहे. सासूची हत्या केल्यानंतर सूनेने तिचे डोळे काढले.

या घटनेनंतर भानावर आलेल्या सूनेने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ती होरपळली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. स्थानिकांच्या माहितीनुसार, घरात ही भयानक घटना घडत असताना, मृत वृद्धेचा पती मांझील हा घराबाहेर होता. या घटनेबाबत त्याला काहीही माहिती नव्हते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment