Kashmir Tour Package:- सध्या उन्हाळ्याचे दिवस अगदी तोंडावर आले असून आता काही दिवसांमध्ये अंगाची लाही लाही करणारा उकाडा सगळ्यांना त्रस्त करून सोडेल. त्यामुळे या उष्णतेच्या कालावधीत किंवा उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये बरेच हौशी पर्यटक भारतातील हिल स्टेशन तसेच थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकत्रित पाहिले तर अनेक थंड हवेचे ठिकाणे असून त्या ठिकाणी देश आणि विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने भेट देत असतात.
या पार्श्वभूमीवर जर या मार्चमध्ये तुम्हाला देखील कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी किंवा थंड प्रदेशात फिरायला जायची इच्छा असेल तर आयआरसीटीसीच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक खास आणि परवडण्याजोगे पॅकेज सादर करण्यात आले आहे
व या पॅकेजेच्या माध्यमातून तुम्हाला भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरला भेट देता येणार आहे. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये अनेक बर्फाच्छादित प्रदेश, सुंदर दऱ्या तसेच त्या ठिकाणचे स्थानिक कलाकुसर व स्थानिक लोकजीवन, त्या ठिकाणचे खाद्य संस्कृती तुम्ही अनुभव शकणार आहात.
मार्चमध्ये फिरायला जाण्याची सुवर्णसंधी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मार्च महिन्यामध्ये जम्मू-काश्मीर फिरता यावे याकरिता आयआरसीटीसीच्या माध्यमातून खास टूर पॅकेज लॉन्च करण्यात आलेले असून जर तुम्हाला काश्मीरला जायची इच्छा असेल तर तुम्ही या पॅकेजचा फायदा घेऊ शकता.
या पॅकेजेचे नाव काश्मीर हेवन ऑन अर्थ एक्स मुंबई ठेवण्यात आलेले असून या पॅकेजचा कालावधी पाच रात्री आणि सहा दिवसांचा आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला फ्लाईटने प्रवास करता येणार असून या अंतर्गत तुम्हाला काश्मीरमधील गुलमर्ग तसेच पहलगाम श्रीनगर हे ठिकाणे पाहता येणार आहेत.
या पॅकेज अंतर्गत तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा देण्यात येणार आहे.तसेच जेवण व नाश्त्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. एवढेच नाही तर या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला प्रवासाचा विमा देखील मिळणार आहे.
किती येईल या टूर पॅकेजेसाठी खर्च?
जर तुम्हाला या टूरकरिता एकटे जायचे असेल तर तुम्हाला ५८५०० रुपये भरावे लागतील. समजा तुम्हाला जर दोन व्यक्ती मिळून जायचे असेल तर प्रति व्यक्ती 49 हजार 600 रुपये इतका खर्च येईल. तीन व्यक्तींकरिता या टूर पॅकेजचा खर्च प्रतीव्यक्ती 46 हजार 300 रुपये इतका आहे.
जर तुमच्या कुटुंबातील लहान मुले तुमच्या सोबत असतील तर त्यासाठी वेगळे शुल्क भरणे गरजेचे आहे. पाच ते अकरा वर्षाच्या मुलासाठी बेडसहित 44 हजार रुपये भरणे गरजेचे आहे व बेडशिवाय 38 हजार पाचशे रुपये इतका खर्च येईल.
कसे कराल बुकिंग?
या टूरसाठी तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. यावरून तुम्हाला या टूरची बुकिंग करता येणे शक्य आहे.
याशिवाय तुम्ही आयआरसीटीसीचे पर्यटक सुविधा केंद्र तसेच क्षत्रिय कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालय मधून बुकिंग करू शकणार आहात.