खुशखबर ! अवघ्या 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट; वाचा सविस्तर माहिती ..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. देशात तब्बल १४ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनावरती अनेक मार्गानी संशोधन सुरु आहे.

आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आता फक्त 400 रुपयांत कोरोना टेस्ट होणार असून एका तासात रिपोर्ट मिळणार आहे.

आयआयटी खरगपूरने कोरोना रॅपिड टेस्ट किटची निर्मिती केली आहे. यामुळे अवघ्या 400 रुपयांत कोरोनाची टेस्ट करता येणार आहे. रॅपिड टेस्ट किटच्या मदतीने कमी वेळेत कोरोनाचे रिपोर्ट मिळणार आहेत.

स्मार्टफोनमध्ये देखील हा रिपोर्ट उपलब्ध होणार आहे. अ‍ॅपच्या मदतीने हे सहज शक्य होणार आहे.

आयआयटी खरगपूरच्या संशोधकांनी या टेस्टसाठी विकसित केलेल्या उपकरणाचा खर्च सुमारे दोन हजार रुपये आहे. तर, आरटी पीसीआर मशीनचा खर्च काही लाखांच्या आसपास असल्याची माहिती मिळत आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment