स्मार्टफोन चाहत्यांसाठी खुशखबर ! 15 मिनिटात फुल चार्ज होणारा 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यावाला ‘हा’ फोन होतोय लॉन्च

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- आता 2020 हे वर्ष संपले आहे. हे वर्ष तसे अनेक संकटांनी भरलेले गेले. आता नवीन वर्ष सुरु होईल. नवीन वर्ष नव्या जोमाने सुरु करण्यास अनेक लोक उत्सुक आहेत. अनेक लोकांना नव्या वर्षात अनेक गोष्टी खरेदीही करायच्या आहेत.

या वर्षाच्या अखेरीस आपण स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. iQOO 7 स्मार्टफोन नवीन वर्षात 11 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. या फोनमध्ये 120 वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

या चार्जिंग टेक्नोलॉजीच्या मदतीने हा फोन केवळ 15 मिनिटात फुल चार्ज करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने या फोनच्या BMW एडिशनचे डिझाइन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवरून फोनच्या रियर डिझाइनची माहिती उघड झाली आहे. यानुसार फोनला तीन रियर फेसिंग कॅमेरा सेटअप मिळणार आहे.

फोनच्या कॅमेरा ट्राइंगल डिझाइन दिली आहे. स्पेशल बीएमडब्ल्यू एडिशनमध्ये व्हाइट रियरसोबत ब्लॅक, रेड आणि ब्लू स्ट्रिप दिली आहे.

या फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज सोबत स्नॅपड्रॅगन 888 5जी प्रोसेसर दिला जावू शकतो. फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment