अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.
स्टेट बँकेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर 11 जानेवारी 2021पर्यंत अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या पदांवरच्या 452 रिक्त जागांवर भरती होणार आहे.

जागेंचा तपशील
- 16 जागा स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (इंजिनीअर – फायर) (SCO)-16 जागा
- डेप्युटी मॅनेजर (इंटर्नल ऑडिट) – 28,
- स्पेशालिस्ट ऑफिसर (नेटवर्क स्पेशालिस्ट) – 32,
- स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (सिक्युरिटी अॅनालिस्ट) – 100,
- स्पेशालिस्ट केडर ऑफिसर – 236,
- स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (मॅनेजर – क्रेडिट प्रोसीजर्स) – 2,
- स्पेशालिस्ट क्रेडिट ऑफिसर (मार्केटिंग) – 38
भरती प्रक्रिया :- काही पदांसाठीची भरती उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर त्यातून निवडलेल्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. अन्य पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन चाचणी होणार असून, ती फेब्रुवारी 2021मध्ये होण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved