खुशखबर ! कोरोनासाठीचे ‘रेमडेसिवर’ मिळणार स्वस्तात; पण ‘हे’ करावे लागणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सर्वसामान्य गरजवंत कोविडच्या रुग्णास स्वस्तात इंजेक्शन उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एका विशेष मेडिकल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे.

इंजेक्शन कुणाला द्यायचे याचा सर्वाधिकार जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांनी नेमलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहेत.

त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णास रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासल्यास रुग्णाच्या नातेवाइकांना जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांनी नेमलेल्या वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व नगर शहर अशा दोनच खासगी मेडिकलमध्ये हे स्वस्तातील इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक राठोड यांनी दिली.

परंतु त्यासाठी सरकारी डॉक्टरांची शिफारस आवश्यक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाचा आजार बळावल्यानंतर रेमडेसिवर हे इंजेक्शन दिले होते. महागडे इंजेक्शन घेणे गरिबांना परवडत नाही.

त्यामुळे सरकारने त्याच्या किंमतीवर नियंत्रण आणले आहे. सरकारी दवाखान्यांत तर ते मोफत दिले जाते. आता खासगी मेडिकलमधील विक्रीवरही नियंत्रण आणण्यात आले असून

2 हजार 360 रुपयांना हे इंजेक्शन मिळणार आहे. शहरातील साई एशियन हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये आणि संगमनेर येथील प्रवरा मेडिकलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment