खुशखबर ! युनियन बँकेने केली कर्जावरील व्याजदरात घट ; जाणून घ्या दर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-राज्यशासित युनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित लँडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये 15 बेसिस पॉइंट्सने घट केली आहे.

ओवरनाइट आणि एक महिन्याचा एमसीएलआर अनुक्रमे 15 आणि 5 बेस पॉईंटने घटवला आहे. ओवरनाइट एमसीएलआर आता 6.75% ऐवजी 6.60% होईल.

त्याच वेळी, एक महिन्याचा एमसीएलआर 6.70% असेल, जो आधी 6.75% होता. सुधारित एमसीएलआर 11 जानेवारी 2021 पासून अंमलात आला आहे.

कार्यकाळ एमसीएलआर (%) :-

  • ओव्हरनाईट एमसीएलआर – 6.60%
  • 1 महिना एमसीएलआर – 6.70%
  • 3 महिन्यांचा एमसीएलआर – 6.90%
  • 6 महिन्यांचा एमसीएलआर – 7.05%
  • 1 वर्ष एमसीएलआर – 7.20%

FD च्या दरांत देखील वाढ :- यापूर्वी , देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयनेही काही निवडक मैच्योरिटी पीरिडयच्या मुदत ठेव (एफडी) दरात वाढ केली.

1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीपर्यंत, बँकेने एफडीवरील व्याज दरांमध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे.

2 कोटी रुपयांपेक्षा कमी रिटेल एफडीवर 8 जानेवारी 2021 पासून एसबीआयचे सुधारित दर लागू आहेत. एसबीआयने यापूर्वी 10 सप्टेंबर 2020 रोजी मुदत ठेवींवरील व्याज दरात सुधारणा केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!