Free DTH TV Channel : मस्तच! टीव्ही रिचार्जचा त्रास संपला, आता मोफत पाहता येणार डीटीएच टीव्ही चॅनेल; फक्त करा हे काम

Ahmednagarlive24 office
Published:

Free DTH TV Channel : डीटीएच टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी रिचार्ज करावा लागतो. टीव्ही रिचार्जच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेकजण सतत टीव्ही रिचार्ज करून कंटाळले आहेत. त्यामुळे अनेकजण काहीवेळा टीव्ही बंद ठेवतात तर काहीजण साधा डीटीएच वापरत आहेत.

डीटीएच टीव्ही चॅनेलला रिचार्ज करून तुम्हीही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला मोफत डीटीएच टीव्ही चॅनेल पाहता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला थोडंस काम करावं लागेल.

तुमच्याकडे डीटीएच सेटअप बॉक्स नसला तरीही तुम्ही सर्व डीटीएच टीव्ही चॅनेल मोफत पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला आता डीटीएचला रिचार्ज करण्याची गरज नाही. यामुळे तुमचे पैसे देखील वाचू शकतात.

डीटीएच टीव्ही चॅनल विनामूल्य कसे पहावे?

जर तुम्हाला मोफत डीटीएच चॅनेल पाहायचे असतील तर त्यासाठी जिओ टीव्ही ॲप वापरावे लागेल. या जिओ टीव्ही ॲपमध्ये तुम्हाला सर्व डीटीएच टीव्ही चॅनेल मोफत पाहता येऊ शकतात.

जिओ टेलिकॉम कंपनीकडून जिओ टीव्ही हे ॲप लॉन्च करण्यात आले आहे. हे ॲप फक्त जिओ वापरकर्त्येच वापरू शकतात. त्यामुळे जिओ वापरकर्त्ये मोफत डीटीएच टीव्ही चॅनेल पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

जिओ वापरकर्त्यांना सिम रिचार्जमध्ये हे जिओ ॲप मोफत पाहता येईल. यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत. मोफत तुम्ही डीटीएच टीव्ही चॅनेल पाहू शकता.

तुमच्या मोबाईलमध्ये मोफत डीटीएच टीव्ही चॅनेल पहा

फ्री डीटीएच चॅनेल पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Jio TV ॲप डाउनलोड करावे लागेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे Jio सिम कार्ड असणे आवश्यक आहे.

तरच तुम्ही मोफत डीटीएच चॅनेल पाहू शकता. जिओ टीव्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला ते उघडावे लागेल आणि टीव्ही चॅनेलची यादी तुमच्या समोर येईल.

मग त्यातून तुमचे आवडते चॅनेल निवडा. Jio TV ॲप व्यतिरिक्त, Jio Cinema एक असे ॲप आहे, ज्यामध्ये तुम्ही सर्व टीव्ही चॅनेल पाहू शकता आणि संगीत देखील विनामूल्य ऐकू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe