Interest Rates Hike : नवीन वर्षात अनेक बँकांनी बचत खाते तसेच गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज अशा योजनांवर व्याज वाढवले आहे. कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फटका बसला आहे. तर पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होणार आहे. बचत खात्यावर व्याज वाढल्याने अधिक पैसे मिळणार आहेत.
खाजगी क्षेत्रातील बँक RBL ने बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी या बँकेत बचत खाते उघडून यामध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे.
25 जानेवारी 2023 पासून RBL बँक नवीन व्याजदर लागू करणार आहे. बचत खात्यावर 1.25 टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ करण्याची घोषणा बँकेकडून करण्यात आली आहे. हे व्याजदर वाढल्यानंतर आता 6.50 टक्के व्याजदर बचत खात्यावर मिळेल.
RBL बँक बचत खाते व्याज दर
बचत खात्यांवरील एक लाख रुपयांच्या दैनंदिन शिल्लक रकमेवर बँक ४.२५ टक्के व्याज देणार आहे.
बँक 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर 5.50 टक्के व्याज देणार आहे. बँक 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर 6% व्याज देणार आहे.
25 लाखांपेक्षा जास्त आणि 7.5 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बचत खात्यावर बँक 6.50 टक्के व्याज देईल.
बँक 7.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 50 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक रकमेवर 6.25 टक्के व्याज देईल.
50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 100 कोटी रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर बँक बचत खात्यावर 5.25 टक्के व्याज देईल.
100 कोटींपेक्षा जास्त आणि 200 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असल्यास, बँक बचत खात्यावर 6% व्याज देईल.
200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 400 कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असल्यास, बँक बचत खातेधारकाला 4 टक्के व्याज दर देईल.
बँकेने 400 कोटींहून अधिक आणि 500 कोटींपेक्षा कमी शिल्लक असलेल्या व्याजदरात 1.25 टक्क्यांनी वाढ केली असून नवीन दर 5.25 टक्के झाले आहेत.
500 कोटींहून अधिक रकमेवर, बँकेने व्याजदरात 75 बेसिस पॉइंट्सने वाढ केली असून नवीन दर 5.25 टक्के झाले आहेत.
एफडी दर वाढले
RBL बँकेने FD व्याजदरातही वाढ केली होती. नवीन दर 19 जानेवारीपासून लागू झाले आहेत. RBL ने 7 ते 364 दिवसांच्या FD वर 50 bps पर्यंत वाढ केली आहे.
बँक आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्यांसाठी 3.50 टक्के ते 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 टक्के ते 6.75 टक्के व्याजदर देत आहे. 453 दिवस ते 725 दिवसांच्या FD वर, सामान्य लोक 7.55 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक 8.05 टक्के झाले आहेत.