KBC मध्ये 1 कोटी जिंकणारा ‘हा’ मुलगा बनला आयपीएस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-2001 साली अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीमध्ये केबीसी ज्युनिअर असा स्पेशल सीझन करण्यात आला होता.

या शोमध्ये 14 वर्षांचा मुलगा रवि मोहन सैनीने सर्व पंधरा प्रश्नांची उत्तर अचूक देऊन एक कोटी रुपये जिंकले होते. आता हाच मुलगा आयपीएस अधिकारी बनला असून पहिले पोस्टिंगदेखील घेतले आहे. रवि मोहन सैनी आता फक्त 33 वर्षांचा आहे.

त्यांनी गुजरातमधील पोरबंदर येथे पोलिस अधिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. एका वृत्तपत्राशी बोलताना सैनी यांनी सांगितले की,त्यांनी महात्मा गांधी मेडिकल कॉलेज जयपूरमधून एमबीबीएसनंतर इंटर्नशीपदरम्यान त्यांची निवड सिविल सर्विसेजमध्ये झाली होती. त्यांचे वडील नेव्हीमध्ये होते.

त्यांना प्रभावित होऊन आयपीएस बनण्याचे ठरविले. भारतीय पोलीस दलात सैनीची निवड 2014 साली झाली होती. त्यांनी अखिल भारतीय स्तरावर 461वी रँक मिळवली होती.

अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीमुळे कित्येक लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

या शोमध्ये मिळालेल्या रक्कमेसोबतच त्यांना ओळखही मिळाली. याचा बारावा सीझन लवकरच सुरू होणार असल्याची अमिताभ बच्चन यांनी घोषणा केली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment