सत्यजित तांबेंकडून मोदींना वाढदिवसाच्या टीकात्मक शुभेच्छा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने मोदी यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजच्या दिवसाला भाजपच्या वतीने देशभर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात आले.

तर याला विरोध दर्शवित आजच्या दिवशी विरोधी पक्षाकडून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर युवकांचे आयकॉन असलेले महाराष्ट्र

युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पंतप्रधान मोदी यांनी जरा हटके स्टाईल मध्ये शुभेच्छा दिल्या. सत्यजीत तांबे यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर खोचक ट्वीट करून पंतप्रधानांचं अभिष्टचिंतन केलं आहे.

काय होते ट्विट मध्ये

तुम रोक ना पाओगे, वह तूफान बन कर आएगा आज का बेरोजगार, तुम्हारी सत्ता उड़ा ले जाएगा… गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.

घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकारनं हा प्रयत्न केला होता. मात्र, त्यातून देशातील जनतेला कुठलाही दिलासा मिळाला नाही,

उलट बेरोजगारी वाढली. केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना कुठलाही दिलासा देऊ शकले नाही, असा आरोपही करण्यात आला होता.

त्याच अनुषंगानं सत्यजीत तांबे यांनी आज ट्वीट केलं आहे. ट्वीटसोबत त्यांनी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment