कोरोनाच्या भीतीने ‘तो’ भारतीय व्यक्ती ३ महिने विमानतळावर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-अमेरिकेत एक भारतवंशीय व्यक्ती कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे तब्बल तीन महिने शिकोगो विमानतळावर लपून बसला होता.

आदित्य सिंह असे या ३६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. आदित्यला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. १९ ऑक्टोबर रोजी तो लॉस एंजेलिसवरून शिकागोत दाखल झाला होता,

मात्र कोरोनाची लागण होईल या भीतीने तो विमातळाबाहेर गेलाच नाही. आदित्यने एअरपोर्ट ऑपरेशन मॅनेजरचा बॅच चोरला होता. या बॅचच्या मदतीने तो विमानतळावर वावरत होता.

प्रवासी आणि इतर कर्मचाऱ्यांकडून अन्न व पैसे मागून तो जगत होता. कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर १६ जानेवारीला त्याला अटक करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment