अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-जर आपण बाजारामधून सोने खरेदी करणार असाल तर आता आपण सोन्याची शुद्धता सहजपणे तपासू शकाल.
यासाठी आपल्याला कोणत्याही ज्वेलर्सकडे जाण्याची आवश्यकता नाही, परंतु केवळ मोबाइल अॅपद्वारे आपण सोन्याची शुद्धता तपासू शकता.
मोबाइल अॅप BIS-केअर अॅप लाँच केले :-केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर अॅप हे मोबाइल ऍप बाजारात आणले आहे. याद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. सरकार देशभरात अनिवार्य गोल्ड हॉलमार्किंग लागू करणार आहे. 1 जुलै 2021 पासून याची अंमलबजावणी होईल.
अॅपद्वारे ग्राहक तक्रारही करू शकतात :- बीआयएस-केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासण्याशिवाय आपण त्यासंबंधात कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्यासंदर्भात माहिती मिळेल.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved