Hill Station: भारतातील ‘हे’ हिल स्टेशन आहे स्वर्गाइतके सुंदर! उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नक्की भेट द्या आणि उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव घ्या

Ajay Patil
Published:
darjiling hill station

Hill Station:- आता मुलांच्या परीक्षा संपतील व उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये व उन्हाळ्याच्या कालावधीत असह्य झालेल्या प्रचंड उकाड्यापासून काही दिवस सुटका मिळावी याकरिता अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः थंड हवेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी किंवा फिरायला जाण्याकरिता ट्रिप प्लॅन करतात.

यामध्ये कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत अशा ट्रिप प्लॅन केल्या जातात. बहुसंख्य व्यक्तींकडून या कालावधीत हिल स्टेशनना भेट देण्यासाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुम्हाला देखील या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला या लेखामध्ये एका सुंदर अशा भारतातील हिल स्टेशनची माहिती देणार आहोत जे स्वर्गापेक्षा सुंदरतेत कमी नाही.

 दार्जिलिंग हे उन्हाळ्यात फिरण्यासाठी आहे प्रसिद्ध हिल स्टेशन

दार्जिलिंग हे भारतातील एक प्रमुख हिल स्टेशन असून ते त्याचे नैसर्गिक सौंदर्य व हिरवागार चहाच्या मळ्यांकरीता आणि त्यासोबतच आल्हादायक हवामानाकरिता ओळखले जाते. हे हिल स्टेशन पश्चिम बंगाल राज्यांमध्ये असून उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

उन्हाळ्याच्या कालावधीत या ठिकाणचे वातावरण खूप सुंदर बनते. दार्जिलिंगला टेकड्यांची राणी असे देखील म्हणतात. हे एक अतिशय शांत आणि सुरक्षित ठिकाण असून पर्यटक या ठिकाणाकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.

 दार्जिलिंगमध्ये तुम्ही काय पाहू शकतात?

या ठिकाणी असलेले नाइटिंगेल पार्क हे सुंदर उद्यान असून विविध प्रकारची फुले आणि हिरव्यागार झाडांसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यामध्ये चांगला आराम आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर नाईटिंगेल पार्क हे उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही मुलांसोबत मस्तपैकी सैर करू शकता.

तसेच या ठिकाणी असलेले रॉक गार्डन हे देखील एक उत्तम असा पिकनिक स्पॉट आहे व धबधबे तसेच नौकाविहार करण्याची सुविधा देखील या ठिकाणी मिळते. तसेच दार्जिलिंगचा सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा व्हिक्टोरिया फॉल्स या ठिकाणी असून तो 86 मीटर उंचीवरून खाली कोसळतो.

व्हिक्टोरिया फॉल्स हा त्याची भव्यता आणि नैसर्गिक सौंदर्य याकरिता खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या व्हिक्टोरिया वाटर फॉल्स मध्ये तुम्हाला बोटिंगची सुविधा देखील मिळते. तसेच जर तुम्हाला दार्जीलिंगमध्ये तुम्हाला शांत आणि सुंदर ठिकाण हवे असेल तर सेंथल लेक हा तलाव खूप प्रसिद्ध आहे.

हा तलाव नौकाविहारासाठी आणि मासेमारी करिता देखील खूप प्रसिद्ध आहे. तलावाच्या अवतीभवती अनेक कॅफे आणि रेस्टॉरंट उपलब्ध असून या ठिकाणी बसून तुम्ही स्वादिष्ट जेवणाचा अनुभव घेऊन निसर्गसौंदर्य न्याहाळू शकतात.

तसेच समुद्रसपाटीपासून 2555 मीटर उंचीवर असलेले टायगर हिल हे देखील एक महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी तुम्हाला माउंट एवरेस्ट सारख्या जगातील सर्वांच्च शिखरांचे दृश्य पाहता येते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सकाळी उठून टायगर हिलवर जाऊन सूर्योदय पाहणे या ठिकाणी एक वेगळीच पर्वणी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe