Hill Station In India: उन्हाळ्यामध्ये ‘या’ हिल स्टेशनना भेट म्हणजेच उन्हाळ्यामध्ये गार गार थंडीचा अनुभव! तुमच्या बजेटमध्ये जा फिरायला

Published on -

Hill Station In India:- सध्या मार्च महिना सुरू असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे व संपूर्ण भारतामध्ये कमी अधिक प्रमाणात आता कमाल तापमानामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नक्कीच अंगाची लाही लाही करणारा उकाडा सगळीकडे जाणवू लागला आहे.

अशा या नकोशा असलेल्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये बरेच जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत  थंडगार अशा हिल स्टेशन्सना भेट देण्याचीयोजना तयार करतात. तसे पाहायला गेले तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी उत्तम असे हिल स्टेशन आहेत व यापैकी अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणच्या हिल स्टेशनला भेट देत असतात.

जर तुमचा देखील या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा या उन्हाळ्याच्या कालावधीत  थंडगार वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मध्य प्रदेश राज्यातील काही महत्त्वाच्या हिल स्टेशनला भेट देऊ शकतात. तसे पाहायला गेले तर मध्यप्रदेश राज्यांमध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने

त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी देशातीलच नव्हे तर विदेशी पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देतात. या अनुषंगाने या लेखात आपण मध्यप्रदेश राज्यातील काही महत्त्वाच्या हिल स्टेशनची माहिती घेणार आहोत.

 मध्यप्रदेश राज्यातील ही हिल स्टेशन उन्हाळ्यात देतील गारेगार अनुभव

1- ओंकारेश्वर हिल स्टेशन ओंकारेश्वर हे देशातील आणि मध्य प्रदेश राज्यातील एक पवित्र धार्मिक स्थळ असून या ठिकाणी देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविक भेट देत असतात.

ओंकारेश्वर येथे कावेरी आणि नर्मदा या दोन्ही नद्यांचा संगम झाला असून हे ठिकाण चहूबाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे. या ठिकाणी धार्मिक वातावरण तर असतेच परंतु सौंदर्याची भुरळ देखील या ठिकाणी पर्यटकांच्या मनाला पडत असते.

ओंकारेश्वर या ठिकाणी तुम्ही सिद्धनाथ मंदिर तसेच काजल राणी गुंफा आणि अहिल्या घाट इत्यादी महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकतात.

2- पंचमढी हिल स्टेशन पंचमढी हे हिल स्टेशन देशात प्रसिद्ध असून ते देखील मध्य प्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेश राज्यामध्ये जितकी हिल स्टेशन आहेत त्यामध्ये पंचमढीचा पहिला क्रमांक लागतो. मध्यप्रदेश राज्यातील होशंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पंचमढी हिल स्टेशन असून

भारतातील सुंदर ठिकाणांमध्ये या हिल स्टेशनची गणना केली जाते. पंचमढी हिल स्टेशनच्या परिसरामध्ये अनेक मनमोहक निसर्ग सौंदर्य, धबधबे, गुहा, मनमोहक टेकड्या तसेच सुंदर असे जंगले देखील आहेत.

3- तामिया हिलस्टेशन तामिया हिल स्टेशन चा इतिहास पाहिला तर याची उभारणी ब्रिटिश कालावधीमध्ये झालेली आहे व हे हिल स्टेशन फोटोग्राफी, ट्रेकिंग तसेच कॅम्पिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेला निसर्गसौंदर्य हा पाहण्यासारखा असून या ठिकाणाचे सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची मजा निराळीच असते.

या ठिकाणी तुम्ही कॅथलिक चर्चा तसेच पातालकोट व आदिवासी संग्रहालय यांना देखील भेट देऊ शकतात. पावसाळ्यामध्ये तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निसर्ग सौंदर्य खुलून दिसते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!