‘सोनियासेना आणखी किती तोंडं बंद करणार?’; अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगना पुन्हा रणांगणात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.

अर्णब यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजप नेत्यांसह अनेकजण उतरले आहेत. तसंच अर्णब यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगना राणावत देखील उतरली आहे. तिने आघाडी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी तिने पुन्हा एकदा शिवसेनेचा उल्लेख सोनियासेना केला, “सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला.

एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील, असं कंगनानं म्हटलं आहे. तसेच अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? असा सवाल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe