ह्युंदाई 1.50 लाखांपर्यंत देत आहे स्वस्त कार ; कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या सर्व माहिती

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-भारतातील काही ह्युंदाई डीलरशिप या महिन्यात अनेक निवडक कारवर सवलत देत आहे. ग्राहक या सूट ऑफरचा लाभ कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसच्या स्वरूपात घेऊ शकतात.

हे लक्षात ठेवा की क्रेटा, वेन्यू, व्हर्ना, आय 20 आणि टक्सनवर कोणतीही सूट नाही. व्हॉल्यूमनुसार भारताची दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनीह्युंदाई, खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्रीला चालना देण्यासाठी काही मॉडेलवर आकर्षक सवलत आणि ऑफर देत आहे.

जर आपणास नवीन ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार असेल तर जानेवारी 2021 मधील झालेल्या किंमतीच्या वाढीने चिंताग्रस्त होऊ नका. कारण या महिन्यातसुद्धा ह्युंदाई दीड लाख रुपयांपर्यंत स्वस्त दरात मोटारी खरेदी करण्याची ओफर देत आहे. चला ह्युंदाईच्या कोणत्या कारवर किती सूट मिळत आहे ते जाणून घेऊया.

ह्युंदाई सॅंट्रो :- ह्युंदाई भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त कार सॅंट्रोवर 20,000 रुपयांची कॅश डिस्काउंट देत आहे. आपल्याला एरा वगळता सर्व ह्युंदाई सॅनट्रो मॉडेल्सवर ही सूट मिळेल. सॅंट्रोच्या एरा व्हेरिएंटवर रोख सवलत 10,000 रुपये आहे. याशिवाय सॅंट्रोच्या सर्व मॉडेल्सवर स्वतंत्रपणे 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे.

ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस :- ह्युंदाई ग्रँड आय 10 निओसच्या सीएनजी वर आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजन मॉडलवर 5000 रुपये कॅश डिस्काउंट देत आहे. 1.0 लिटर टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटवर 25,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तथापि, सर्व समान मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस फक्त 10,000 रुपये आहे.

ह्युंदाई ऑरा ;- ह्युंदाईच्या सब -4 मीटर सेडान ऑरावर जास्तीत जास्त 30,000 रुपयांची कॅश डिस्काउंट आहे, परंतु ती केवळ 1.0 लिटर टर्बो-पेट्रोल मॉडेल्सवर उपलब्ध असेल. 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.2 लीटर डिझेल वेरिएंट वर रोख सवलत 10,000 रुपये आहे. सीएनजी मॉडेलवर कोणताही डिस्काउंट नाही. जोपर्यंत एक्सचेंज बोनसचा प्रश्न आहे, प्रत्येक मॉडेलवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.

या कारवर दीड लाख रुपये वाचवा :- ह्युंदाई कोना ही दक्षिण कोरियाई कार निर्माता कंपनीची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्यास एक नवीन फेसलिफ्ट केले आहे. भारतीय बाजारात या कारच्या विद्यमान व्हेरिएंटवर दीड लाख रुपयांची प्रचंड सूट दिली जात आहे.