Tourist Destination: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दक्षिणेकडील ‘या’ राज्यात फिरायला जा आणि मस्त मजा करा! निसर्ग सौंदर्याची पडेल भुरळ

Ajay Patil
Published:
tourist destination

Tourist Destination:- भारतामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या ऋतू नुसार फिरता येतील असे डेस्टिनेशन म्हणजेच पर्यटन स्थळे असून या ठिकाणच्या पर्यटन स्थळांना देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भेटी देत असतात.

भारताला ज्याप्रमाणे उत्तुंग अशा डोंगररांगांची संपदा लाभली आहे त्याचप्रमाणे विस्तीर्ण सागर किनारा देखील लाभला आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये निसर्ग सौंदर्याची उधळण आणि पर्यटन स्थळांची रेलचेल आपल्याला बघायला मिळते.

सध्या मार्च महिना सुरू झाला असून उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये बरेच जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत किंवा हनिमूनकरिता अनेक ठिकाणी ट्रिपचा प्लान करत असतात.

साहजिकच उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने भारतातील थंड हवा असलेली किंवा थंड वातावरण असलेले ठिकाणांना पर्यटनासाठी प्राधान्य दिले जाते. अगदी याच पद्धतीने तुमचा देखील या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये कुटुंबासमवेत किंवा मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला न्यायचा प्लॅन असेल

तर तुम्ही दक्षिणेकडील देवभूमी म्हणून ओळखले जाणारे केरळ या राज्याला भेट देऊ शकतात. केरळचे नैसर्गिक सौंदर्य नक्कीच तुम्हाला भूरळ घालेल. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये केरळ राज्यातील काही महत्त्वाची पर्यटन स्थळांची माहिती थोडक्यात घेणार आहोत.

 उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी केरळमधील हे ठिकाणे आहेत महत्वाची

1- मुन्नार मुन्नार हे केरळ राज्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून निसर्गप्रेमी असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण नेहमी पर्यटकांना खुणावते. या ठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर तसेच सुंदर अशा टेकड्या आणि दऱ्या खोऱ्याचा प्रदेश मनाला भुरळ घालतो.

एकदा तुम्ही मुन्नारला गेला तर तुम्हाला तिथून बाहेर निघावेसे वाटत नाहीत. इतके त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम असे आहे.

तसेच मोठ्या प्रमाणावर चहाच्या बागा या ठिकाणी असल्याने त्याकरिता देखील मुन्नार खूप प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी इको पॉइंट्स असून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात व त्याचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकतात.

2- वायनाड वायनाड हे ठिकाण केरळ राज्यात असून अतिशय सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये वायनाडचा समावेश होतो. या ठिकाणी असलेले धबधबे तसेच ऐतिहासिक लेण्या व अनेक पर्यटन स्थळे तुम्हाला पाहायला मिळतात.

या ठिकाणाची सुंदर अशी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. येथील दऱ्या खोऱ्यांमधील नयनरम्य परिसर तसेच हिरवळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

3-अलेप्पी अलेप्पी हे ठिकाण केरळ मधील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक असून या ठिकाणचा समुद्रकिनारा प्रामुख्याने हॉलीबॉल आणि सर्फीग सारख्या अॅक्टिविटीजसाठी चांगला पर्याय आहे.

या बीचवर तुम्ही अनेक प्रकारच्या वॉटरस्पोर्टचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी देखील दरवर्षी मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी होत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe