सध्या उन्हाळा सुरू असून संपूर्ण भारतामध्ये जवळपास कमी अधिक प्रमाणात उष्णतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची स्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हा 40° च्या पुढे आहे. नेमक्या अशा या उष्ण वातावरणामध्येच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असल्यामुळे बरेच जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाता यावे याकरिता ट्रिप प्लॅन करतात.
उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये अशा ट्रिप प्लॅन करताना प्रामुख्याने हिल स्टेशन्स म्हणजे ज्या ठिकाणी प्रामुख्याने थंडगार वातावरण राहील अशा ठिकाणी भेट देण्याला प्राधान्य दिले जाते. भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्याच्या या तप्त वातावरणात गारेगार वातावरणाचा फील घेऊ शकतात.
त्यामुळे या लेखात आपण हिमाचल प्रदेश मधील अशाच काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत जी तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी उत्तम ठरतील.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हिमाचल मधील या ठिकाणांना द्या भेट
1- डलहौसी– हिमाचल प्रदेशामध्ये जर तुम्हाला फिरायला जायचे असेल तर डलहौसी हे एक उत्तम ठिकाण आहे. उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी अतिशय अल्हाददायक वातावरण असते व या ठिकाणची हिरवळ पर्यटकांना मोहनी घालत असते.
या ठिकाणी तुम्ही व्होलो बसने पोहचू शकतात. जेव्हा या ठिकाणी पर्यटनाचे सीजन असते तेव्हा हॉटेल मिळणे देखील मुश्किल होते. त्यामुळे तुम्हाला जर जायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी आगाऊ हॉटेलची बुकिंग करणे कधीही चांगले ठरेल.
2- पालमपूर– हे ठिकाण हिमाचल प्रदेश मध्ये असलेल्या कांगडा खोऱ्यामध्ये वसलेले एक हिल स्टेशन आहे. या ठिकाणचे हिरवेगार निसर्ग सौंदर्य, पर्वतराजी आणि उत्तम निसर्ग सौंदर्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
या ठिकाणी असलेले जंगल, चहाच्या बागा इत्यादी पाहण्यासारखे आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण असून या ठिकाणी देखील पिक सीजनमध्ये हॉटेल्स महाग मिळतात व त्यामुळे आगाऊ बुकिंग करून ठेवणे चांगले ठरते.
3- धर्मशाला, शिमला आणि राणीखेत– हिमाचल प्रदेशमध्ये शिमला, धर्मशाला आणि राणीखेत ही उत्तम हिल स्टेशन असून हे हिमाचल राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वसली आहेत. या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जाऊन तुम्ही उष्णतेच्या कालावधीत गारेगार वातावरणाचा अनुभव घेऊ शकतात.
4- पार्वती व्हॅली आणि मनाली– हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामध्ये पार्वती व्हॅली असून एडवेंचर्स आणि कॅम्पिंगची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. तसेच पर्वतांच्या कुशीमध्ये वसलेले मनाली हे देखील एक सुंदर ठिकाण असून मनालीचे सुंदर हवामान व त्या ठिकाणी असलेले पर्वत व मॅगी हे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत.