Beautiful Expressway In India:- भारतामध्ये आपल्याला अनेक बाबतीत विविधता दिसून येते व ही विविधता भौगोलिक दृष्ट्या तसेच प्राणी व नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टिकोनातून तर आहेच.परंतु प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या परंपरा तसेच स्थानिक चालरीती व बोलीभाषेच्या बाबतीत देखील दिसून येते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे भारताचा जर आपण संपूर्ण विचार केला तर निसर्गाची मोठी देण देखील मोठया प्रमाणावर लाभली असल्याने भारताच्या कानाकोपऱ्यात आपल्याला निसर्गाची मुक्त हस्ते उधळण केलेली दिसून येते व त्यामुळे भारताच्या सुंदरतेत आणखीनच भर पडते.
पर्यटन स्थळांच्या दृष्टिकोनातून देखील भारत समृद्ध आहे व त्यामुळे लाखोंच्या संख्येने देश-विदेशातून पर्यटक विविध पर्यटन स्थळांना दरवर्षी भेटी देत असतात. पर्यटन स्थळांच्या अनुषंगाने जर विचार केला तर यामध्ये भारतात असे काही महामार्ग आहेत की त्यावरून जर तुम्ही प्रवास केला तर तुमची एक छान पैकी ट्रिप आयोजित होते व तुम्हाला निसर्ग सौंदर्य अगदी जवळून अनुभवता येते.
जर तुम्ही या महामार्गावरून एकदा जरी प्रवास केला तरी हा क्षण तुमच्या कायम आठवणीत राहील अशा प्रकारचे नैसर्गिक सौंदर्य या महामार्गांच्या बाबतीत आपल्याला दिसते.त्यामुळे या लेखात आपण असे भारतातील निसर्गाने समृद्ध असलेले कोणते महामार्ग आहेत? त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू.
भारतातील या महामार्गावरील प्रवास म्हणजे मिळेल निसर्गसौंदर्याची अनुभूती
1- मनाली-लेह महामार्ग- मनाली ते लेह हा महामार्ग नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा महामार्ग असून या महामार्गावरून केलेला प्रवास हा तुमच्या कायम स्मरणात राहील.
या दोन्ही शहरा दरम्यानचा हा महामार्ग 479 किलोमीटर लांबीचा असून हा महामार्ग फक्त वर्षातून केवळ तीन ते चार महिनेच वाहतुकीसाठी खुला असतो. कारण या ठिकाणी बाकीच्या दिवसांमध्ये जोरदार हिमवृष्टी होत असते.
2- बंगलोर-उटी महामार्ग- तुम्हाला जर निसर्गा विषयी प्रेम असेल व तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही एकदा बेंगलोर ते उटी या महामार्गावरून प्रवास करावा. हा महामार्ग भारतातील सर्वात सुंदर महामार्गांपैकी एक आहे.
या महामार्गावरून प्रवास करताना तुम्हाला आजूबाजूला हिरवीगार अशी कुरणे आणि जंगले दिसतात व उंचच उंच झाडे मनाला भुरळ घालतात. भारतातील सर्वात सुंदर महामार्गांच्या यादीमध्ये या महामार्गाचा समावेश होतो.
3- शिलॉंग-चेरापुंजी महामार्ग- भारतातील सर्वात सुंदर महामार्गांपैकी शिलॉंग ते चेरापुंजी हा महामार्ग देखील निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. शिलॉंग ते चेरापुंजी या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वर्षभर संपूर्णपणे धुक्याने व्यापलेला असतो.
हा प्रवास फक्त दीड तासाचा आहे. परंतु या दीड तासाच्या ट्रीप मध्ये तुम्हाला निसर्गाचे अद्भुत असे सौंदर्य अनुभवता येते व अनेक दृश्य डोळ्यात साठवता येतात.
4- मुंबई-गोवा महामार्ग- महाराष्ट्रामधील मुंबई ते गोवा हा महामार्ग देखील भारतातील सुंदर महामार्गाच्या यादीमध्ये असून या महामार्गावरून प्रवास करताना अद्भुत असे निसर्ग सौंदर्याचे दर्शन आपल्याला घडते
व अनेक सुंदर नजारे आपल्याला पाहता येतात. सगळीकडे हिरवीगार जंगले दुतर्फा पसरलेली असल्याने या महामार्गावरूनचा प्रवास म्हणजेच अनोखा असा अनुभव ठरतो.
5- गुवाहाटी-तवांग महामार्ग- गुवाहाटी ते तवांग हा महामार्ग भारताच्या ईशान्येला असून ज्याला भारताचे नंदनवन असे म्हटले जाते. भारतातील ईशान्य कडील असलेले अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हा महामार्ग असून या ठिकाणी भारतीय आणि परदेशी नागरिकांना प्रवास करताना मात्र इनर लाईन परमिट घ्यावे लागते.
तुम्हाला जर सुंदर अशी दृश्य पाहायचे असतील व निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर या महामार्गावरून प्रवास करणे फायद्याचे ठरेल.