जाणून घ्या कोरोना व्हायरसच्या टेस्टबद्दल महत्वाची माहिती खर्च, वेळ आणि सर्व काही….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  देशात आणि राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मर्यादित ‘टेस्ट किट’चा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे आणि निदान यांची टेस्ट करण्यासाठी देशात ‘टेस्टिंग फॅसिलिटी’ मर्यादित आहेत.

सध्या भारतात एका कोरोनाच्या टेस्टला जवळपास पाच हजारांचा खर्च येतो. काही खाजगी चाचणी संस्थांना पाच हजारांच्या दराने या चाचणीला परवानगी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. 

आता न्युमोनिया असलेले सर्व रुग्ण व कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले व्यक्ती, लक्षणे दाखवणारे सर्व आरोग्य कर्मचारी आणि ज्यांनी १४ दिवसात आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे तसेच कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत आहेत, अशा प्रत्येकाची पाच ते १४ दिवसात चाचणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.

सध्या उपलब्ध चाचणीपध्दतीनुसार कोरोना विषाणूच्या तपासणीला बराच वेळ लागत आहे. कॅलिफोर्निया येथील ‘सेफेड’ या कंपनीने विकसित केलेल्या ‘कोरोना व्हायरस डायग्नोस्टिक’ टेस्टला अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाने २१ मार्च २०२० रोजी मान्यता दिली आहे. 

संशयित रुग्णाला संसर्ग आहे की नाही हे या चाचणीने फक्त ४५ मिनिटांत खात्रीने समजते. जगातील इतर देशांमध्ये अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि इटली आदी देशासह अनेक ठिकाणी जे टेस्टींग किट वापरत आहेत ज्याचे देखील रिझल्ट लागण्यास काही मिनिटे लागतात. 

 

आज आपण पाहणार आहोत कोरोना व्हायरसचे निदान कसे करतात त्यांच्या टेस्ट, त्यांच्या खर्च याबद्दलची माहिती.  

1) नॅसलस्वाब टेस्ट
नाव : टॅक्पाथ कोवीड-१९ कॉम्बो किट
निदान वेळ: चार तास
डीआयवाय चाचणीत संक्रमित रूग्णांच्या नाकात असलेला कोरोना विषाणूने दिलेला विशिष्ट डीएनए शोधला जातो.या चाचणीला या आठवड्यात अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मान्यता दिली होती.

2) फिंगर प्रिक टेस्ट
नाव: कोवीड-१९ रॅपिड टेस्ट कॅसेट
निदान वेळ: दहा मिनिटे
एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास ९८ टक्के अचूक निदान करता येते.यासाठी बोटांना टाचणी टोचून रक्ताचा नमुना घेतात. त्यानंतर त्यास स्क्रीनिंग डिव्हाइसमध्ये दहा मिनिटे ठेवले जाते.ही टेस्ट वैध ठरली असून यापूर्वी यूके, आयर्लंड, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, युएई,आदी देशांत या चाचणीचा उपयोग केला जात आहे. 

3) फेस मास्क टेस्ट 
निदान वेळ: १२ तास
या टेस्टसाठी मास्क म्हणजे मुखवटयामध्ये श्वासोच्छ्वास करण्यास सांगितले जाते.
शास्त्रज्ञांनी ही टेस्ट स्वस्त म्हणजे केवळ दोन पाऊंडमध्ये तयार केली आहे. या चाचणीला प्राधान्य दिले जाते.या चाचणीने क्षयरोग, फुफ्फुसांना होणारा प्राणघातक संसर्ग यशस्वीपणे शोधून काढता येतो.

4) ब्रिथ टेस्ट
निदान वेळ: त्वरित
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या रूग्णांना वेगाने ओळखण्यास मदत करणारी ही एक श्वास तपासणी विकसित केली आहे.
न्यू कॅसलमधील नॉर्थंब्रिया विद्यापीठाच्या एका तंत्रज्ञ टीमने विकसित केलेले तंत्रज्ञान यासाठी वापरले जात आहे.

5)  प्रायवेट हार्ले स्ट्रीट क्लिनिक
निदान वेळ : तीन दिवस
– नाक आणि घशातील स्वाब म्हणजे कापसाचा लहानसा बोळा वापरून ही टेस्ट घेतली जाते.
– किंमत ३३ हजार ११० भारतीय रुपये इतकी महाग आहे.

6)  सीटी स्कॅन टेस्ट
डायग्नोस्टिक वेळ : एक तास ३० मिनिटे
फुफ्फुसांचे नुकसान ओळखण्यासाठी सीटी स्कॅन केले जाते. ‘इमेज प्रोसेसिंग’ तंत्राने कोवीड-१९ संसर्ग फैलावण्याचा वेगही कळतो.
फुफ्फुसातील विशिष्ट नमुने ओळखण्यास ही चाचणी सक्षम आहे.
कोवीड -१९ हा विकसित होणास दोन आठवड्याचा कालावधी घेतो, यामुळे तो सहज ओळखता येतो.

7) फिंगर प्रिंट टेस्ट 
नाव: कोविड-१९ आयजीएम आयजीजी रॅपिड चाचणी
निदान वेळ : १५ मिनिटे
कोरोना विषाणूसाठी रक्ताचा एक छोटा थेंब घेऊन १५ मिनिटांत यंत्राच्या स्क्रीनवर येऊ शकते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment