अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-गेल्या 2 दिवसात अदानी गॅसच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. काल कंपनीचा शेअर्सदेखील 52 आठवड्यांच्या शिखरावर पोहोचला.
मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 20 टक्के वाढ झाली. गेल्या 2 दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्के वाढ झाली. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या स्टॉकमध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याला थेट 40% परताव्यानुसार 2 लाख रुपयांचा नफा होईल.
गेल्या दोन दिवसांत हा 5 लाख रुपयांचा शेअर्स 7 लाख रुपयांवर परिवर्तीत झाला. तथापि, शेअर्समध्ये एवढी मोठी वाढ झाल्याच्या बाबतीत बीएसईने अदानी गॅसवर प्रश्नचिन्ह उभे केले, त्यास उत्तर म्हणून कंपनीने सांगितले की, बाजारातील वाढीमुळे ही तेजी होत आहे.
अदानी ग्रुपची डील :- अदानी गॅस अदानी ग्रुपची एक कंपनी आहे. या महिन्याच्या सुरूवातीस, अदानी समूहाने इटलीच्या Snam बरोबर बायोगॅस, बायोमॅथेन आणि लो-कार्बनच्या विकासासाठी भागीदारीची घोषणा केली. कंपन्यांद्वारे अशा व्यापार भागीदारीचा त्यांच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होतो.
अदानी गॅसचा नवीन करार :- Snam आणि अदानी गॅस यांनी सीएनजी कॉम्प्रेसर मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसाठी जॉइंट वेंचर तयार करण्याचा करार केला आहे.
आज अदानी गॅसच्या शेअर्समध्ये किंचित घट झाली आहे. मागील कंपनीच्या 343.75 रुपयांच्या बंद पातळीच्या तुलनेत आज जवळपास फ्लॅट 343.70 रुपयांवर उघडल्यानंतर आज कंपनीचा शेअर 326.40 रुपयांवर आला.
दुपारी 12:30 च्या सुमारास कंपनीचा शेअर 2.7 टक्क्यांनी घसरून 334.35 रुपयांवर आला. या किंमतीवर कंपनीचे बाजार भांडवल 36,673.17 कोटी रुपये आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved