सोने-चांदीच्या दरात वाढ; आणून घ्या दर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-जागतिक बाजारात अनिश्‍चित परिस्थिती असल्यामुळे स्थानिक सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगली वाढ पाहायला मिळाली.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली सोमवारी सोन्याचा भाव १८५ रुपये प्रति १० ग्रॅम वाढ दिसून आली आहे. या वाढीमुळे सोन्याचा भाव ४९ ,७५७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

गेल्या सत्रात सोने ४९,५७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर भाव बंद झाला होता. चांदीमध्ये १,३२२ रुपयांची वाढ झाली. या घटीमुळे चांदीची किंमत ६८,१५६ रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.

गेल्या सत्रात चांदी ६६,८३४ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.सिक्युरिटीनुसार जागतिक स्तरावर सोने-चांदीचे मूल्य वाढीमुळे भारतीय बाजारात मौल्यवान धातूची किंमतीवर परिणाम झाला.

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊन सोन्यचा दर 1,885 डॉलर प्रति औंस व चांदीचा दर 26.32 डॉलर प्रती औंस झाला. डॉलर कमकुवत झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत.

डॉलरच्या मूल्यात घटमुळे सोन्याच्या भावात तेजी पाहायला मिळाली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्टेने संदर्भात चिंता आणि लॉकडाऊन संदर्भात अनिश्चितता यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे, असे एचडीएफसी सिक्‍युरिटीचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले.

येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी ६० हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा २२०० डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment