दरमहा 595 रुपये गुंतवा आणि लखपती व्हा ! ‘या’ बँकेची योजना

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक खास योजना आणली आहे. सेंट लखपती असं या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला लाखभर रुपये मिळू शकणार आहेत.

या योजनेअंतर्गत 1 वर्षापासून 10 वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत बँक दोन प्रकारे तुम्हाला व्याजदर देते. एका वर्षासाठी तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 6.65 टक्के व्याज मिळते.

तर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर 6.45 टक्के व्याज दिले जाते. एका वर्षामध्ये लाखोंचा फायदा हवा असेल तर तुम्हाला दरमहा 8040 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

जर तुम्ही ही गुंतणूक 1 वर्षासाठी केली तर तुम्हाला वर्षाअखेर बँकेकडून 1 लाख रुपये मिळतील. या योजनेत तुम्हाला 6.65 टक्के व्याज मिळेल.

सेंट लखपती या योजनेअंतर्गत तुम्ही 10 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर 1 लाख मिळतील, त्यासाठी तुम्हाला दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe