कोरोनाच्या संकटातच या आजाराचा झाला शिरकाव!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  कोरोनाच्या संकटामुळे देश त्रस्त असताना आसाममध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लूमुळे जवळपास २५०० डुकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आसाम राज्यातील सात जिल्ह्यांच्या तब्बल ३०६ गावांमध्ये रविवारपर्यंत इतक्या डुकरांचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे; पण यामुळे मानवाला धोका नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

देशात आफ्रिकन स्वाइन फ्लूचा शिरकाव होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. आफ्रिकन स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने डुकरांना मारण्याची परवानगी दिली आहे;

पण तातडीने हे पाऊल न उचलता दुसऱ्या पर्यायांचा विचार केला जात असल्याची माहिती आसामचे पशुसंवर्धनमंत्री अतुल बोरा यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment