Jio चा डेटा धमाका; ‘ह्या’ प्लॅन्समध्ये मिळतोय ‘इतका’ अतिरिक्त डेटा , वाचा अन लाभ घ्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत.

लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि त्यांना तसा बेनिफिट देणे हे लक्ष्य आणि उद्दीष्ट ठेऊन अनेक कंपन्या आपले प्लॅन्स आणत आहेत.

टेलिकॉम कंपन्यांच्या वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक रिचार्ज योजना आहेत. रिलायन्स जिओच्याही प्रत्येक ग्राहक विभागाच्या गरजेनुसार अनेक योजना आहेत.

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री कॉलिंगबरोबरच डेटाचा लाभही देण्यात येत आहे. जिओने सध्या असे प्लॅन आणले आहेत कि जे आपल्याला अतिरिक्त डेटा लाभ मिळवून देतात.जाणून घेऊयात त्या प्लॅनविषयी –

401 रुपयांच्या प्रीपेड योजनेत 6 जीबी बोनस डेटा :- या योजनेत यूजर्सना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. पण या व्यतिरिक्त कंपनी 6 जीबी बोनस डेटा देत आहे.

इतकेच नाही तर योजनेबरोबरच जिओ टू जिओवर अमर्यादित कॉल आणि अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 मिनिट ऑफर केली जात आहे.

28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या योजनेमध्ये यूजर्सना दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. तसेच डिस्ने + हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

777 रुपयांच्या प्रीपेड योजनेत 5 जीबी बोनस डेटा :- रिलायन्स जिओच्या 777 रुपयांच्या प्रीपेड योजनेत दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येत आहे.

या योजनेची वैधता 84 दिवसांची आहे आणि यावेळी वापरकर्त्यांना 5 जीबी बोनस डेटाही मिळत आहे. म्हणजेच, वैधता दरम्यान, वापरकर्ते एकूण 131 जीबी डेटा घेऊ शकतात.

याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ टू जिओवर अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 3,000 मिनिटे दिली जात आहेत. एवढेच नाही तर डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

2,599 रुपयांच्या प्रीपेड योजनेत 10 जीबी बोनस डेटा :- जिओच्या 2,599 रुपयांच्या या प्‍लान मध्ये अमर्यादित डेटा सुविधा मिळू शकेल. या योजनेसाठी दररोज 2 जीबी डेटा आणि 10 जीबी अतिरिक्त डेटा दिला जात आहे.

म्हणजेच, 365 दिवसांच्या वैधतेसह या योजनेत वापरकर्ते एकूण 740 जीबी डेटा बेनिफिट घेऊ शकतात. यात डिस्ने + हॉटस्टारवर फ्री एक्सेस देखील मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment