कशाला जायचे मालदीव आणि बाली? भारतातील ‘या’ सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट द्या आणि निवांत क्षणांचा अनुभव घ्या

Ajay Patil
Published:
lakshdwip iceland

भारत म्हटले म्हणजे भारताला निसर्गाने खूप सढळ हाताने अनेक प्रकारचे निसर्ग सौंदर्य आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या पर्यटन स्थळांनी भारत समृद्ध आहे. तुम्ही उत्तरे पासून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमे पर्यंत भारताचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येक राज्यांमध्ये पर्यटन स्थळे दिसून येतात.

तसेच भारताला विस्तीर्ण अशा सागरी किनारा लाभला असल्यामुळे देखील त्यामुळे भारताच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. बेटांचा विचार केला तर भारतातील बरेच पर्यटक बाली आणि मालदीव सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. परंतु त्या ऐवजी जर भारतातील लक्षद्वीप सारख्या ठिकाणी जर भेट दिली तर त्यापुढे मालदीव आणि बालीसारखे बेटे देखील फिके आहेत.

लक्षद्वीप हे पर्यटन स्थळ भारतातील एक अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळ असून ते एक केंद्रशासित प्रदेश देखील आहे व महत्त्वाचे म्हणजे भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रामध्ये आत आहे.

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत देखील लक्षद्वीप या सुंदर ठिकाणी भेट देऊ शकतात व हनिमून साठी देखील हे ठिकाण उत्तम आहे. त्यामुळे या लेखात आपण भारतातील या अद्वितीय अशा ठिकाणाबद्दल महत्वाची माहिती बघणार आहोत.

 लक्षद्वीप आहे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण

1- लक्षद्वीपमधील आगत्ती बेट लक्षद्वीप मध्ये तुम्ही गेल्यानंतर अगत्ती बेट हे अतिशय सुंदर असे ठिकाण असून प्रवाळ खडकांच्या रमणीय दृश्यांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जाते. हे लक्षद्वीप बेट समूहातील लहान बेट असून या ठिकाणाचे स्वच्छ पाणी तसेच पांढरी वाळू, समुद्रकिनारे आणि जोडप्यांसाठी एक अतिशय सुंदर व रोमांचक ठिकाण आहे. लक्षद्वीप हे आठ किलोमीटर परिसरामध्ये विस्तारले असून त्या ठिकाणी 8000 पेक्षा अधिक लोक राहतात.

2- मिनीकॉय बेट मिनीकॉय बेट हे लक्षद्वीप बेटा मधील प्रमुख आकर्षणांपैकी एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. लक्षदीप या प्रमुख बेटांमध्ये जे काही 36 लहान लहान बेटे आहेत त्यामध्ये याचा समावेश होतो. हे बेट कोचिन किनाऱ्यापासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी असलेले प्रवाळ खडक, आकर्षक अशी पांढरी वाळू आणि अरबी समुद्राचे सुंदर पाणी पाहण्याची मजा काही औरच असते.

3- बंगाराम बेट बंगाराम बेटे हे हिंदी महासागराच्या स्वच्छ निळ्या पाण्यात वसलेले एक अद्भुत ठिकाण असून हे बेट प्राचीन कोरल रिफ आणि समुद्रकिनारे यासाठी ओळखले जाते. या बेटांवर तुम्ही सुंदर मासे, डॉल्फिन मासे पाहण्याचा आनंद घेऊ शकता तसेच सूर्या दय आणि सूर्यास्तासह पोहण्याचा आनंद काही औरच असतो. तुम्ही या ठिकाणाच्या स्वच्छ पाण्यामध्ये स्कुबा डायव्हीगचा आनंद घेऊ शकतात.

4- कावरत्ती बेटे लक्षदीप मधील जे काही सुंदर बेटे आहेत त्यापैकी कावरत्ती बेट हे एक रत्न म्हणून ओळखले जाते व हे लक्षदीपची राजधानी देखील आहे. या ठिकाणची पांढरी वाळू आणि सुंदर दृश्य मनाला मोहून जातात. हे बेट कोची किनाऱ्यापासून 360 किलोमीटर अंतरावर असून हे बेट 12 प्रवाळ, पाच जलमग्न किनारे आणि तीन प्रवाळ खडकांसाठी प्रामुख्याने ओळखले जाते व या ठिकाणी असलेले नारळाची सुंदर झाडे आणि जल क्रीडा पर्यटकांना प्रामुख्याने आकर्षित करते.

5- लक्षद्विपचे सागरी संग्रहालय हे सागरी संग्रहालय कावरत्ती बेटावर असून सागरी संग्रहालयामध्ये समुद्राशी संबंधित असलेल्या कलाकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. या संग्रहालयामध्ये समुद्री मासे आणि पाण्यातील प्राण्यांच्या प्रजाती सर्वात जास्त दिसून येतात. तुम्हाला जर सागरी जीवनाबद्दल अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही या सागरी संग्रहालयाला भेट देऊन ती घेऊ शकतात.

शिवाय इथे अनेक सुंदर अशी ठिकाणे असून पर्यटकांनी या ठिकाणी भेट देणे खूप फायद्याचे ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe