अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी, तसेच गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केला असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आघाडी सरकारने राज्यात शक्ती कायदा करण्याचे ठरवले आहे.
शक्ती कायद्याच्या विधेयकास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत आहोत, या कायद्यामुळे महिलांना शक्ती मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे सांगितले.
नव्या कायद्यानुसार महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याचा खटला २१ दिवसांत निकाली काढण्यात येणार आहे. याचबरोबर बलात्कारप्रकरणी अजामीनपात्र गुन्हा, अल्पवयीन मुलींवर अत्याचारास मरेपर्यंत जन्मठेप आदी स्वरूपाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
नव्या शक्ती कायद्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसणार असून महिलांनी अत्याचाराच्या विरोधात निर्भीडपणे पुढे यावे, असे आठरे यांनी म्हटले. या कायद्यामुळे महिला सुरक्षेला प्राधान्य मिळाल्याचे यातून दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com