अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-देशातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज तब्बल ७४०.१९ अशांनी खाली येत ४८,४४०.१२ बंद झाला.
तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २२४.५० अंकांनी घसरत १४,३२४.९० च्या पातळीवर स्थिरावला.
चालू आठवड्याच्या दुसऱ्या सत्र व्यवहारात म्हणजेच मंगळवारी फक्त दोन्ही निर्देशकांनी तेजी नोंदवली होती.
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 1.51 टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 1.54 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.
टॉप गेनर्स शेअर्स :- सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्स विषयी बोलताना आज डॉ. रेड्डी, आयसीआयसीआय बँक,
एचडीएफसी आणि एलटी यांचे शेअर्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले आहेत. याशिवाय 26 शेअर्स रेड मार्कवर बंद झाले आहेत.
विक्री झालेले शेअर्स :- या व्यतिरिक्त मारुती 3.98 टक्क्यांनी घसरून टॉप लूजर्सच्या लिस्टमध्ये आहे.
त्याचबरोबर, HUL, Bharti Airtel, Bajaj Auto, NTPC, ONGC, Reliance, SBI, Sun Pharma, HDFC Bank, IndusInd Bank, Kotak Bank सर्वच रेड मार्कवर बंद झाले आहेत.
देशभरातील कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकरणांमुळे भांडवली बाजारात (Share Market) चिंतेने पडझड झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील भांडवली बाजारांचा प्रभाव देखील देशातील दोन्ही निर्देशकांवर झाले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कालच्या पडझडीनंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल 3.27 लाख कोटी रुपयांनी कमी झाली होती. तर, कंपन्यांचे बाजार मूल्य 202.48 लाख कोटींवर येऊन ठेपले होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|