अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- ऑनलाईन शॉपिंग साइट वरून नवीन व महाग मोबाईल फोन मागवला जातो. पण बर्याच वेळा या बॉक्समधून साबण, वीट किंवा अन्य कचरा यात सापडल्याचे बरेचदा समोर आले आहे. याच संदर्भात अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पोलिसांनी बॉक्समधून आयफोन चोरणाऱ्या आणि फोनऐवजी त्यात साबण टाकणाऱ्या भामट्यास पकडले आहे. आश्चर्य म्हणजे त्या भामट्याने एक किंवा दोन नव्हे तर 1 कोटी रुपयांचे मोबाईल फोन चोरले आहेत. प्रकरण असे आहे की अमेझॉन इंडियाचे वेअर हाऊस मेवात मध्ये आहे.
Apple आणि सॅमसंग सारख्या बर्याच मोठ्या कंपन्या आपला माल येथे साठवतात जेणेकरुन जर कोणी Amazon वर फोन मागवला तर तो त्याच गोदामातून थेट वितरीत केला जाईल. या वेअर हाऊसमध्ये मोबाइल कंपन्या नव्हे तर शॉपिंग साईट्सचे कर्मचारी स्वतः फोन वगैरे पॅक करत ग्राहकांपर्यंत पोहोचतात.
या प्रक्रियेमध्ये डिलीवरी फास्ट होते आणि खर्च ही कमी येतो. मीडिया रिपोर्टनुसार, येथे काम करणारे अन्सार-उल-हक आणि नवाब नावाचे दोन कर्मचारी कित्येक महिन्यांपासून वेअर हाऊसमध्ये ठेवलेले महागडे स्मार्टफोन चोरी करीत होते. हे लोक आयफोनच्या बॉक्समधून मोबाइल फोन काढून साबण आणि वीट यासारख्या वस्तूंनी भरत होते आणि नंतर ते पॅक करत होते व परत स्टॉकमध्ये ठेवत होते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही महिन्यांत या दोन लोकांनी 78 मोबाइल फोन स्टॉक मधून काढले, ज्यांचे मूल्य 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमेझॉन वेअर हाऊसच्या अधिकाऱ्यांना फोनबॉक्समध्ये मोबाईलच्या जागी इतर गोष्टी येत असल्याच्या बातम्या सातत्याने मिळत गेल्यावर त्यांनी तपासणी केली.
या तपासणीनंतर हे उघडकीस आले आहे की बर्याच मोबाईल फोनचे रिटेल बॉक्स रिकामे आहेत आणि त्यांत स्मार्टफोन नाही. व्यवस्थित चौकशी केल्यानतर लक्षात आले तेव्हा 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे मोबाइल गायब असल्याचे आढळले.
पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा दोन कर्मचार्यांची नावे पुढे आली होती ज्यांनी थोड्याच दिवसापूर्वी नोकरी सोडली होती. चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी अॅमेझॉनला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्याचे कबूल केले. गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडील 38 मोबाइल फोन जप्त केले,
ज्यांची किंमत 50 लाखांच्या जवळ असल्याचे समजते. या 78 मोबाइल फोनमध्ये, 76 Apple आणि 2 सॅमसंग फोनचा समावेश आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घोटाळ्यामध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तपास अद्याप सुरू असून आहे.
पोलिसांचे असे आहे म्हणणे :- सहायक पोलिस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपी सप्टेंबर 2018 पासून अॅमेझॉन वेअरहाऊस (जमालपूर) येथे काम करत होते.
अनलॉक मध्ये सोशल डिस्टन्स ठेवत काम करण्याच्या पद्धतीचा फायदा घेत त्यांनी आयफोन 11 आणि आयफोन 11 प्रो चोरी करण्यास सुरवात केली.
मोबाईल काढून तो गोदामात रिकामे डबे फेकत असे. त्यांनी 76 आयफोन आणि 2 सॅमसंग मोबाईल चोरून नेले. त्याचे आणखी दोन साथीदार असून त्यांजवळ 40 फोन विक्रीस देण्यात आले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved