मोदी सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना देणार ‘हा’ फायदा; जाणून घ्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व केसीसी स्कीम लिंक केल्यानंतर देशातील दीड कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत. त्यांच्या खर्चाची मर्यादा 1.35 लाख कोटी रुपये आहे. 24 फेब्रुवारी 2020 पासून किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना केसीसी देण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात होती.

मोदी सरकारने दोन लाख कोटी रुपये खर्चाची मर्यादा असलेली 2.5 करोड़ किसान क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा केली होती. तर आत्ता पीएम किसानच्या आणखी 1 कोटी लाभार्थ्यांना केसीसी मिळणार आहे. पीएम किसान आणि केसीसीच्या लाभार्थी यांच्यामधील दरी भरून काढायची सरकारची इच्छा आहे.

त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थ्यांना केसीसी घेणे सोपे झाले आहे. या स्कीम मधील नोंदणीकृत शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक झाले आहे. त्यांच्या शेती, बँक आणि आधारच्या रिकॉर्ड व्हेरिफाय केल्या आहेत. त्यामुळे बँक त्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास टाळाटाळ करू शकत नाही.

सरकारचा निर्णय काय आहे ? :-   पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशातील 11.45 कोटी शेतकऱ्यांचा आधार कार्ड, महसूल रेकॉर्ड आणि बँक खाते क्रमांकाचे डेटाबेस केंद्र सरकारकडे आला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने 6000 रुपयांच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकर्‍यांच्या या रेकॉर्डला यापूर्वीच मान्यता दिली आहे.

अशा परिस्थितीत बँक यासाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ शकत नाही. पीएम किसान योजनेचा फायदा आपल्याला मिळत असल्याचे शेतकरी बँकेला सांगू शकतो आणि त्यातील प्रत्येक नोंदी केंद्र व राज्य सरकारने सत्यापित केली आहे. केसीसी योजनेला पंतप्रधान किसान योजनेशी जोडल्यानंतर केवायसीचा त्रासही संपला आहे.

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आता केवळ एक पानाचा फॉर्म भरावा लागणार आहे. जे pmkisan.gov.in वर भेट देऊन फॉर्मर टॅबच्या उजव्या बाजूवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. येथे केसीसी फॉर्म डाऊनलोड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. प्रिंटनंतर फॉर्म भरावा लागेल. केसीसीवर चार टक्के व्याज दराने शेतीसाठी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

असे आकारतात केसीसीवर व्याज दर :- केसीसीवर शेतीसाठी घेतलेल्या ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे व्याज ९ % प्रमाणे आहे. परंतु सरकार त्यात २ % अनुदान देते. अशा प्रकारे तो ७ टक्क्यांपर्यंत खाली येते. वेळेवर परत केल्यास तुम्हाला ३ % अधिक सूट मिळेल. अशा प्रकारे जागरूक शेतकऱ्यांसाठी त्याचा दर फक्त ४ टक्के आहे.

शेतकऱ्यांना फायदा, आर्थिक पत सुधारेल :- देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय केसीसी अंतर्गत शेतकऱ्यांना विशेष आणि स्वस्त कर्ज उपलब्ध करून देते. केसीसीवरील कर्जाची मिळकत अत्यंत सोप्या पद्धतीने केली जाते. खरं तर ही योजना शेतकऱ्यांना सुलभ आणि स्वस्त कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

याबद्दलची माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक शेती असणार्याना तसेच संयुक्त पद्धतीने शेती करणार्यांना तसेच भाड्याने जमीन घेणार्‍या शेतकर्‍यालाही त्याचा फायदा मिळू शकेल. पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थ्यांविषयी सरकारकडे आधीपासूनच आवश्यक माहिती उपलब्ध असल्याने केसीसीमार्फत कर्ज मिळवणे कठीण होणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment