अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : देशभरात कोरोनाने घातलेल्या थैमानानंतर आर्थिक व्यवस्था मोडकळीस आली आहे. याला उभारी देण्यासाठी मोदी सरकारने मंगळवारी 50,000 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेस प्रारंभ केला .
याअंतर्गत मोबाइल डिव्हाइस बनविणार्या जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मदतीसाठी अर्ज मागविण्याचे काम सुरू केले आहे.
जगातील अव्वल मोबाइल उत्पादकांनी पुढे येण्यासाठी भारत प्रयत्न करेल आणि पाच निवडक स्थानिक कंपन्यांना पाठिंबा दिला जाईल. जवळपास 5 ते 6 मोठ्या कंपन्यांचे जागतिक बाजारपेठेच्या 80 टक्के बाजारावर नियंत्रण आहे.
सुरुवातीला आम्ही पाच जागतिक कंपन्यांची निवड करू ज्यांना (उत्पादन आधारित प्रोत्साहन) योजनेंतर्गत सहभागी होण्याची परवानगी असेल अशी माहिती माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
या योजना आज (मंगळवार) पासून सुरू झाल्या आहेत. आणखी कंपन्या या संदर्भात अर्ज करू शकतात असे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी सचिव अजय प्रकाश साहनी यांनी सांगितले.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की, जागतिक स्तरावरील आघाडीच्या मोबाइल कंपन्या येत्या दोन-तीन वर्षांत भारतात येतील आणि लवकरच देश या विभागात पहिल्या क्रमांकावर येईल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews