पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : इंधनाच्या किंमती कमी करुन कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणाऱ्या जनतेला दिलसा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का? अच्छे दिन याला म्हणावयाचे का? असा सवाल उपस्थित करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी, अहमदनगर शहर कॉंग्रेस पक्षाने केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भिंगार अध्यक्ष ऍड.आर.आर.पिल्ले, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, पक्षाचे शहर सरचिटणीस अभिजित कांबळे,

प्रांतिक सदस्य शामराव वाघस्कर, शहर चिटणीस मुकुंद लखापती, महिला कॉंग्रेसच्या अलका बोरुडे, सरचिटणीस सुभाष रणदिवे, भिंगार कॉंग्रेस सचिव निजाम पठाण आदी उपस्थित होते.

डिझेलच्या किंमती पूर्वी पेट्रोल दरापेक्षा कमी होत्या, त्या आता अधिक महाग असल्याने जीवनाश्‍यक वस्तूंच्या किंमती ही वाढणार म्हणजे सर्वत्र महागाई होणार यातून जनतेला दिलासा कसा मिळणार अशी खंत व्यक्त करण्यात आली.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या 15 दिवसात 10 रुपयांची वाढ झाली. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ कायम आहे. मंगळवारी सलग 17 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ झाली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment