Mukesh Ambani’s Successors : मुकेश अंबानी हे भारतातील आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती $86.8 अब्ज (सुमारे ₹7.2 लाख कोटी) आहे. पण त्यांच्या तीन वारसदारांचीही श्रीमंती काही कमी नाही. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी हे तिघेही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत आणि आपल्या पायावर उभे आहेत. त्यांच्याकडे जबरदस्त संपत्ती असून, त्यांच्या वार्षिक पगाराची आणि एकूण संपत्तीची आकडेवारीही चकित करणारी आहे.
ईशा अंबानी – रिलायन्सच्या व्यवसाय साम्राज्यात महत्त्वपूर्ण भूमिका
मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी पिरामल यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा वाटा आहे. त्या रिलायन्स रिटेल, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स फाउंडेशनमध्ये कार्यकारी नेतृत्व पथकाची एक प्रमुख सदस्य आहेत. तसेच त्या टिरा ब्युटीच्या सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत. ईशा अंबानी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनातही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची वार्षिक कमाई सुमारे ₹4.2 कोटी आहे, तर एकूण संपत्ती सुमारे ₹800 कोटी असल्याचा अंदाज आहे. अन्य वारसदारांच्या तुलनेत त्यांची संपत्ती तुलनेने कमी असली तरी, रिलायन्सच्या मोठ्या व्यवसायांमध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

आकाश अंबानी – सर्वात श्रीमंत वारसदार
ईशा अंबानी यांचे जुळे भाऊ आकाश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात पुढे आहेत. ते रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष असून, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डावरही संचालक आहेत. डिजिटल क्रांतीच्या युगात जिओच्या विस्तारात त्यांचे मोठे योगदान आहे. आकाश अंबानी यांची संपत्ती थक्क करणारी आहे. त्यांचा वार्षिक पगार सुमारे ₹5.6 कोटी आहे, तर त्यांची एकूण संपत्ती तब्बल $40.1 अब्ज (सुमारे ₹3,32,815 कोटी) आहे. ते तिघांमध्ये सर्वात श्रीमंत असून, रिलायन्सच्या भविष्यातील डिजिटल आणि टेलिकॉम व्यवसायासाठी ते एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
अनंत अंबानी – पुढील पिढीसाठी मजबूत नेतृत्व
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी देखील आता रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे. ते रिलायन्सच्या ऊर्जा आणि दूरसंचार क्षेत्रांची देखरेख करतात. तसेच, ते जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डावर संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा वार्षिक पगार ₹4.2 कोटी आहे, तर एकूण संपत्ती $40 अब्ज (सुमारे ₹3,32,482 कोटी) आहे. ते जरी थोड्या काळापूर्वी रिलायन्समध्ये अधिक सक्रिय झाले असले, तरी भविष्यात ऊर्जा क्षेत्रात मोठा प्रभाव टाकण्याची त्यांची तयारी दिसून येते.
तिघांपैकी कोण सर्वात श्रीमंत?
अंबानी कुटुंबात आर्थिक ताकद पाहता आकाश अंबानी हे सर्वात श्रीमंत वारसदार आहेत. त्यांच्या पाठोपाठ अनंत अंबानी आणि त्यानंतर ईशा अंबानी यांचा क्रम लागतो.
मुकेश अंबानींनी तिघांनाही मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या
तिघेही वारसदार जरी भांडवलाच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्तरावर असले, तरी मुकेश अंबानी यांनी तिघांनाही व्यवसायात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. ईशा अंबानी रिलायन्स रिटेल आणि फाउंडेशनवर लक्ष केंद्रित करत आहेत, तर आकाश अंबानी टेलिकॉम क्षेत्राचा भार सांभाळत आहेत. अनंत अंबानी ऊर्जा आणि ग्रीन एनर्जी प्रकल्पांवर काम करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली तिघांनीही स्वतःचा व्यवसायात ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. भविष्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वेगवेगळ्या विभागांचे नेतृत्व कोण करणार, याकडे संपूर्ण उद्योगजगताचे लक्ष लागून राहणार आहे.