जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका भारतालाच

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : २००८ साली अमेरिकेतील सबप्राईम समस्येमुळे आलेल्या जागतिक मंदीचा भारतावर फारसा परिणाम झाला नव्हता; पण सध्या हळूहळू गंभीर होत असलेल्या आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका भारतासारख्या उभरत्या अर्थव्यवस्थानाच बसेल, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवहा यांनी काढला आहे.

क्रिस्टलीना यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर दहावर्षातील नीचांकी पातळीला पोहोचण्याची भीती व्यक्त केली आहे. ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागेल, असे भाकीत क्रिस्टलीना यांनी वर्तवले आहे. दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था प्रगतीपथावर होती. जीडीपीचा विचार केल्यास ७५ टक्के जगाचा प्रवास विकासाच्या दिशेने सुरू होता. ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागू शकतो, असा आमचा अंदाज आहे, असे क्रिस्टलीना म्हणाल्या.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांचे हे पहिले भाषण होते. अमेरिका आणि जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अमेरिका, जपान आणि युरोपमधल्या विकसित देशांमध्ये आर्थिक घडामोडींचा वेग मंदावला आहे.

भारत, ब्राझील सारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येतील, असे क्रिस्टलीना यांनी सांगितले. क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी या महिन्यात आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार संभाळला. क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी आपल्या भाषणात जे म्हटले आहे, त्याचे परिणाम भारतात दिसत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment