जयपूर : जवळपास २० वर्षांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेल्वेची चेन खेचल्याप्रकरणी अभिनेता व खासदार सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यावर रेल्वे न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
परंतु दोघांनीही रेल्वेच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. १९९७ मध्ये ‘बजरंग’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना ही घटना घडली होती. अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सनी देओल आणि करिश्मा कपूरवर अपलिंक एक्स्प्रेसची चेन विनाकारण खेचल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे रेल्वेला जवळपास २५ मिनिटे उशीर झाला होता. याप्रकरणी २००९ मध्ये दोघांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र २०१० मध्ये याविरोधात दोघांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
सत्र न्यायालयाने २४ एप्रिल २०१० रोजी दोघांची या आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली होती; परंतु रेल्वे न्यायालयाने पुन्हा १७ सप्टेंबर रोजी दोघांविरोधात आरोप निश्चित केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या निर्णयाला बुधवारी सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
- 5 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58 टक्क्यावर ! महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार लाभ?
- .…तर वाहनांना टोल नाक्याच्या पुढे जाताच येणार नाही ! टोल वसुलीबाबत केंद्राचा नवा निर्णय कसा असणार ?
- व्यवसायासाठी सरकार करणार आर्थिक मदत ! काहीही तारण न ठेवता मिळणार 20 लाख रुपये
- शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांना टीईटी सक्तीच्या आदेशातून मिळणार सूट, वाचा सविस्तर
- ब्रेकिंग ! सोमवारी पुणे शहरातील ‘हे’ रस्ते राहणार बंद; शाळा-कॉलेजसला पण सुट्टी













