नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल खाणकाम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

कोल इंडिया सध्या आपल्या २ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत आहे. सरकारने कामगारांच्या पदोन्नतीमधील अडथळे दूर केले आहेत. कोल इंडियाच्या आठ सहयोगी कंपन्या आहेत. ही कंपनी दरवर्षी १ हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करते; पण यंदा ही कंपनी २ हजार नवे अधिकारी नियुक्त करणार आहे.
यापैकी ४०० जणांची नियुक्ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीतील २ हजार जणांना पदोन्नती देऊन अधिकारी स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे. मागील तीन वर्षांपासून अशा नियुक्त्यांचे प्रमाण सरासरी ५ हजार आहे.
यंदादेखील सरासरी ५ हजार कामगारांची भरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारवर विना रोजगार विकास असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- 10 ग्रॅम सोन्यावर किती कर्ज मिळतं? व्याज, EMI आणि नियमांचा ‘ए टू झेड’ हिशोब
- देशात 7 नवे हाय-स्पीड रेल कॉरिडॉर; मुंबई-पुणेसह प्रमुख शहरांमध्ये प्रवासाला नवी गती
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! ‘सल्फर-लेपित युरिया’ खताची किंमत ४० किलोसाठी २५४ रुपये निश्चित
- आयकर स्लॅबमध्ये बदल नाही; नवीन की जुनी कर व्यवस्था? मध्यमवर्गाने काय निवडावे
- ‘लाडकी बहीण’चा हप्ता २१०० रुपये करणार; कोल्हापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा













