अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऑटोमोबाईल उत्पादक टाटा मोटर्सने आपली नवीन एसयूव्ही सफारीचे अनावरण केले.
कंपनीच्या पुणे प्लांटमध्ये त्याचे प्रॉडक्शन केले जात आहे. टाटा मोटर्सने अद्याप या एसयूव्हीची किंमत जाहीर केली नसली तरी त्याची किंमत 13 लाख ते 20 लाखांदरम्यान असू शकते असा अंदाज आहे. नवीन टाटा सफारी जुन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
आज आम्ही एका डील बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये आपण 2 लाख रुपयांच्या रेंजमध्ये जुन्या टाटा सफारी खरेदी करू शकता. वास्तविक, टाटा सफारी (Tata Safari 4X4 EX DICOR 2.2 VTT 2007) सेकंड हँड कार विक्री करणाऱ्या DROOM या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 2 लाख रुपयांच्या रेंजमध्ये आपण खरेदी करू शकता.
सुमारे 85 हजार किलोमीटर धावलेली टाटा सफारी सेकेंड ओनरकडून विकली जात आहे. या डील साठी आपल्याला DROOMच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे आपल्याला टोकन रक्कम जमा करावी लागेल, जी रिफंडेबल असेल.
फेब्रुवारीच्या अखेरीस नवीन एसयूव्ही सफारीची विक्री :- नवीन एसयूव्ही सफारीचे बुकिंग पुढील महिन्यात सुरू होणार आहे. नवीन सफारी डी 8 प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे जी लँड रोव्हरमध्ये वापरली जाते.
कंपनीने म्हटले आहे की हे प्लॅटफॉर्म भविष्यात इलेक्ट्रिक किंवा अल्ल-व्हील ड्राइव्ह आवृत्तीमध्ये जाण्याची परवानगी देते. कंपनीची आणखी एक एसयूव्ही हॅरियर देखील या डी 8 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या मॉडेलसाठी बुकिंग 4 फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्याची विक्री फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved