व्होडाफोन- आयडिया आणि पेटीएम यांनी नवीन प्रीपेड वापरकर्त्यांसाठी ‘रिचार्ज साथी’ प्रोग्रॅम सुरू केला आहे.
या प्रोग्रॅममुळे वापरकर्त्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना महिन्याला ५ हजार रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे.

या प्रोग्रॅमच्या साहाय्याने कोणताही पेटीएम ग्राहक आयडिया वोडाफोनचे रिचार्ज करू शकतो आणि पैसे कमावू शकतो. युजर्सने केवळ पेटीएम अॅप डाउनलोड करून, नोंदणी करुन मोबाइल रिचार्जची विक्री करू शकतात.
कंपनीने असा दावा केला आहे की, व्होडाफोन आयडियाद्वारे मर्चंट पार्टनरला एकाधिक रिचार्जवर कॅशबॅक देखील देण्यात येईल. या नवीन प्रोग्रॅमअंतर्गत एखाद्या व्यक्तीला किंवा छोट्या व्यावसायिकाला दरमहा ५ हजार रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते.













