संतापजनक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यासह ४ भावंडांची कुऱ्हाडीने हत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- आई-वडील मध्य प्रदेशातील मूळगावी नातेवाइकाच्या दशक्रियाविधीसाठी गेले असताना रात्री शेतातील घरात एकटे झोपलेल्या आदिवासी कुटुंबातील ४ अल्पवयीन बहीण-भावंडांची (दोन मुली व दोन मुले) कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

या खळबळजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादला. रावेरपासून काही अंतरावरील बोरखेडा रस्त्यावरील केळीच्या शेतातील एका पत्र्याच्या घरात ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

दरम्यान, पोलिसांनी काही तासांतच तिघांना ताब्यात घेतले असून त्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चौघांची हत्या केल्याची कबुली दिली.

कविता (नाव बदलले, १४), राहुल (११), अनिल (८) व सुमन (६, सर्व मूळ रा. गढी, ता.बिस्टन, जि. खरगोन, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.

शेतमालक शेख मुस्तफा शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास शेतात पोहोचले. त्यांना भिलाला यांच्या घराचा दरवाजा बंद दिसला. भिलाला कुटुंबीयांची शेळी रोज रात्री ते घरात तर सकाळी घराबाहेर बांधत असत.

परंतु सकाळी मुस्तफा यांना शेळी घराबाहेर दिसली नाही. घराचा दरवाजाही बंद दिसला. त्यामुळे त्यांनी घरातील मुलांना आवाज दिला. मुस्तफा यांनी दरवाजा ढकलून पाहिला.

त्यांना चौघे बहीण-भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यामुळे मुस्तफा यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe