Paytm बँकेची भन्नाट योजना… FD वर मिळवा 7 टक्के व्याज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाउनच्या काळात बँकांनी व्याज दर कमी केल्यामुळे लोक गुंतवणुकीसाठी ईतर पर्याय शोधत आहेत. अशातच आता Paytm पेमेंट्स बँक मध्ये FD करणे फायद्याचे ठरू शकते.

कारण, पेटीएम पेमेंट्स बँक 7 टक्के व्याज दराने एफडीची सुविधा देत आहे. खरंतर, पेमेंट्स बँकांना मुदत ठेवीची सुविधा देण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकने indusind बँकेसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये व्याज दर हा indusind बँकेकडून ठरवला जातो. पेटीएम पेमेंट बँकेच्या एफडीमध्ये मॅच्युरिटी पीरियड 13 महिन्यांचा आहे.

या एफडीमधील विशेष बाब म्हणजे मॅच्युरिटी पीरिएडआधी जरी एफडी तोडली तरी कोणताही चार्ज द्यावा लागत नाही.

जाणून घ्या इतर बँकांचे व्याजदाराविषयी

एयू स्मॉल फायनान्स बँक:- इथे तुम्हालाा 7 टक्के दराने व्याज मिळेल.

डीसीबी बँक :- या बँकेमध्ये 6.95 टक्के दराने व्याज मिळत आहे. तर 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर व्याजदर वाढून एकूण रक्कम 2,11,696 रुपये होईल.

आयडीएफसी बँक :- या बँकेत 6.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. डीसीबी बँकेमध्ये 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांनंतर एकूण रक्कम 2,09,625 रुपये होईल.

आरबीएल बँक – ही बँक 5 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज देते. इथे तुम्हाला 1.5 लाख रुपयांवर 5 वर्षानंतर 2,09,625 रुपये मिळतील.

येस बँक :- इथे 6.25 टक्के दराने व्याज मिळत असून, 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 2,09,625 रुपयांचा फायदा होईल.

Deutsche Bank आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक :- 5 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याजदर मिळतो. इतकंच नाही तर 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांनी याची एकूण रक्कम वाढत 2,02,028 रुपये होईल.

बंधन बँक :- 5 वर्षांच्या एफडीवर तुम्हाला या बँकेत 6 टक्क्यांनी व्याज मिळेल. तर 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर तुमची एकूण रक्कम 2,02,028 कोटी रुपये होईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment