अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढवले आहे. महसुलामध्ये तूट निर्माण झाली आहे. यासाठी राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरांत दोन रुपयांनी वाढ केली आहे.
सोमवारपासून (१ जून) राज्यात मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत याची अंमलबजावणी होणार असून पुढील १० महिन्यांत राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल.
राज्याला महसुलाची गरज असल्याने पेट्रोल व डिझेलवरील करात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या करवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात दरमहा ३०० कोटी रुपयांची वाढ होईल.
राज्यात दरमहा सरासरी ११ लाख ६६ हजार किलोलिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होते. एक किलोलिटर म्हणजे एक हजार लिटर. म्हणजेच राज्यात दरवर्षी सुमारे १ कोटी ३९ लाख ९२ हजार किलोलिटर पेट्रोल-डिझेलची विक्री होते.
२०१९-२० मध्ये राज्य सरकारला पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करातून एकूण २४ हजार ९०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews