Petrol Pump Frauds in India : पेट्रोल पंपावर ग्राहकांची अशी केली जाते फसवणूक, फसवणुकीपासून वाचायचे असेल तर जाणून घ्या हे मार्ग…

Ahmednagarlive24 office
Published:

Petrol Pump Frauds in India : आजकाल देशातील अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच पेट्रोल भरताना फसवणूक केल्याने ग्राहकांना मोठा तोटा होत आहे.

पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक केल्याचे त्यांना कळतही नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावर फसवणूक होऊ नये यासाठी तुमच्याकडे काही माहिती असणे आवश्यक आहे. पेट्रोल पंपावर फसवणूक होऊ नये यासाठी तुम्हाला ५ मार्ग सांगणार आहोत.

1. कमी इंधन फसवणूक

अशी फसवणूक तुमची अनेकदा केली असेल पण तुम्हाला माहिती होत नसेल. अनेकदा पेट्रोल पंप कर्मचारी पूर्वी भरलेल्या तेलाचे मीटर रिसेट करत नाहीत आणि तिथून पुढेच ते पेट्रोल भरायला सुरुवात करत असतात. त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये कमी पेट्रोल भरले जाऊ शकते. त्यामुळे तेल भरण्यापूर्वी तुम्ही ० पाहणे आवश्यक आहे.

2. इलेक्ट्रॉनिक चिप्सपासून सावध रहा

आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे पेट्रोल पंप चालक पेट्रोल पंपावर मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप्स बसवतात. ही चिप तुमच्यासाठी तोट्याची ठरू शकते. कारण तुमच्या कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पूर्ण पेट्रोल भरल्याचे दाखवते मात्र असे नसते. चिप्समुळे कमी प्रमाणात पेट्रोल भरले जाते.

जर तुम्हाला अशी शंका आली तर तुम्ही पेट्रोल भारत असलेल्या पंपावर 5 लिटर टेस्ट करू शकता. सर्व पेट्रोल पंपावर 5 लिटरचा स्केल उपलब्ध असतो. या स्केलमध्ये तुम्ही पेट्रोल भरून शंका दूर करू शकता.

3. सिंथेटिक तेल

अनेकदा तुमच्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये न विचारता सिंथेटिक तेल टाकले जाते. पण तुम्हाला नको असताना देखील याचे जास्त पैसे द्यावे लागतात. सामान्य तेलापेक्षा या तेलाची किंमत 5 ते 10 टक्के जास्त असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी तेल भरण्याअगोदरच तुम्ही सामान्य तेल भरायचे आहे हे सांगा.

4. इंधनाची गुणवत्ता तपासा

अनेकदा तुम्ही पेट्रोल भरत असलेल्या पंपावर खराब इंधन भरले जाते. त्यामुळे अनेकदा तुमची बाईक मायलेज कमी देत असते. तुम्ही फिल्टर पेपर चाचणी करण्यासाठी पेट्रोल पंपावर विचारू शकता.

ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार, प्रत्येक पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि आवश्यक असल्यास ग्राहक त्याची विनंती करू शकतात. फिल्टर पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाकल्यास पेट्रोल शुद्ध आहे की भेसळ आहे हे कळू शकते.

5. पेट्रोलची किंमत

कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप चालक सरकारकडून ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे आकारू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पेट्रोल भरण्यापूर्वी मशीनमध्ये सेट केलेली किंमत पाहू शकता. त्यामुळे तुमच्याकडून जास्त तर पैसे आकारले जात नाहीत ना हे समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe