रेल्वे मंत्रालयाने 1 जूनपासून नॉन एसी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन सेकंड क्लास दर्जाच्या असणार असून त्यांचे बुकिंग ऑनलाइनच करता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन झाले. त्यामुळे रेल्वेने २३ मार्चपासून प्रवासी वाहतूक बंद केली होती. आता रेल्वेने दररोज 200 अतिरिक्त विना वातानुकूलित ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूरांच्यासाठी 1 मे पासून रेल्वे मंत्रालयाने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या. आतापर्यंत 1600 ट्रेनच्या माध्यमातून 21.5 लाख मजूरांची त्यांच्या राज्यात रवानगी करण्यात आली आहे.
आता दिवसाला देशभरात अशा 200 श्रमिक स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त 1 जूनपासून दररोज वेळापत्रकावर आधारित 200 विना वातानुकूलित ट्रेन चालविण्यात येणार असून त्या द्वितीय दर्जाच्या असणार आहेत.
या ट्रेनची तिकीटेही केवळ ऑनलाइनच बुक करता येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.