Ration Card New Rules :- नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण रेशन कार्ड संबंधित महत्वाची माहिती घेणार आहोत. मित्रांनो राज्य सरकारकडून रेशन कार्ड संबंधी महत्त्वाची नियम लागू करण्यात आले आहेत, त्यानुसार आता अनेक रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे.
म्हणजेच राज्यातील बऱ्याच लोकांना रेशन मिळणार नाही, त्यांचे रेशन जप्त होणार आहे; सोबतच सरकार द्वारे त्यांच्या सर्व कुटुंबावर कारवाई केली जाणार आहे. आपण जाणून घेऊया नक्की काय आहेत हे नियम.
कोरोना काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे नागरिकांना मोफत रेशन पुरवठा करण्यात आला होता. त्या काळात अनेक अपात्र नागरिकांनी सुद्धा मोफत रेशन चा लाभ घेतला, त्यावर कारवाई करण्यासाठी आता शासनाने रेशन कार्ड संबंधी नवे नियम लागू केले आहेत.
सरकारद्वारे अपात्र नागरिकांना लवकरात लवकर त्यांचे रेशन कार्ड सरेंडर करण्याचे आवाहन केले गेले आहे, नागरिकांना त्यांचे रेशन कार्ड जमा करण्यासाठी सांगण्यात आले आहे. जर या आवाहना नंतरही अपात्र नागरिकांनी त्यांचे रेशन कार्ड जमा केले नाही किंवा सरेंडर केले नाही, तर अशा अपात्र नागरिकांवर शासनाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
अपात्र रेशन कार्ड धारक कोण आहेत?
ज्या शिधापत्रिका धारक व्यक्ती कडे स्व उत्पन्नातून घेतलेला 100 चौरस मीटरचा प्लॉट आहे किंवा घर आहे, आणि त्याच्याकडे चारचाकी गाडी, ट्रॅक्टर, शस्त्र परवाना आहे. सोबतच कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे; असे सर्व रेशनकार्ड धारक अपात्र ठरवण्यात आले आहेत.
जर वरील निकष तुम्हाला लागू होत असतील तर कृपया तुमचे रेशन कार्ड तहसील कार्यालयात जाऊन जमा करावे, अन्यथा कठोर कारवाई होऊ शकते.
आता फक्त रेशन दुकानावर पात्र शिधापत्रिका धारकांना रेशन मिळणार आहे, वर सांगितल्याप्रमाणे अपात्र व्यक्तींना रेशन मिळणार नाही. हा निर्णय मोफत रेशन साठी सरकार द्वारे घेण्यात आलेला आहे.
तर ही होती रेशन कार्ड संबंधीची महत्त्वाची अशी माहिती पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. धन्यवाद!